पिंपरी-चिंचवड

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. ५ : माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे घडली.
आरती सुनील खडसे (वय २१, रा. रामनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुनील त्र्यंबक खडसे (वय ३०), सासरा त्र्यंबक खडसे , सासू, नणंद ममता, सविता, अनिता व अनिताचा नवरा, आणखी नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरती या सासरी नांदत असताना त्यांनी माहेराहून पैसे घेऊन येण्यासाठी आरोपींनी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. वेळोवेळी पैशांची मागणी करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार ७ मे २०२१ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत घडला. दरम्यान, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT