पिंपरी-चिंचवड

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली !

CD

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली

डॉक्टरांना न विचारताच ही औषधे घेण्याचे प्रमाण सत्तर टक्के वाढल्याचे समोर

पिंपरी, ता.२३ ः ओमिक्रॉन रूग्ण सापडत असल्याने सर्दी, खोकला, घशाची खवखव ही कोरोनाच्या आजाराची लक्षणे असल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी या आजारावरील औषधे आधीच खरेदी करून ठेवण्याचा सपाटा लावला आहे. तसेच, अशी काही लक्षणे दिसताच डॉक्टरांना न विचारताच ही औषधे घेण्याचे प्रमाण ७० टक्के वाढल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लोक कमालीचे सावध झाले आहेत. सर्दी, खोकला आणि घसादुखी ही कोरोनाचे लक्षणे असल्यामुळे यापैकी काहीही होताच लोकांनी त्यावरची औषधे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या आजारावर लागू पडणारे पॅरासिटामोल, क्लोरोक्वीन व अन्य औषधांची मागणी दुपटीने वाढली आहे. कसलाही आजार नसलेले लोकही काळजीपोटी ही औषधे घेऊन ठेवू लागले आहेत.
सध्या कोरोन आणि सामान्य तापाचे रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणेही साधर्म्य आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घशाची खवखव, वारंवार शिंक येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. एरवीही अनेकांना हा त्रास जाणवत असतो. डॉक्टरांकडून अशा रुग्णांना आवश्यकतेनुसार पॅरासिटामोल, अॅजिथ्रोमायसिन अशी औषधे दिली जातात. त्यामुळे लोक मेडिकलमधून आधीच ही औषधे घेऊन ठेवू लागले आहेत. क्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या आजारावर लागू पडत असल्याची चर्चा सध्या फार्मास्टिटमध्ये आहे. त्यामुळे हे औषध घेण्याकडेही काही लोकांचा कल आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय लोक ही औषधे मागत आहेत. त्यामुळे काही केमिस्टनी अशा पद्धतीने औषध देणे बंद केले आहे.

रोज दहा हजारावर चाचण्या; आठ तपासणी केंद्र
कोरोनाबाधितांचा आकडा हजारांवर गेला आहे. ओमीक्रॉनचेही पाच रूग्ण आढळून आले आहेत. लोक बाधित होऊ नये म्हणून महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात तपासण्या सुरू केल्या आहेत. दररोज दहा हजारांवर चाचण्या होत आहे.

‘‘कोरोनासारख्या भयंकर आजारात काळजी घेणे गरजेचे आहे, यात वाद नाही. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे योग्य नाही. कुणाला काही त्रास वाटत असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सूचनेनुसारच औषधे घ्यावेत. सध्या ओमिक्रॉनची लक्षणे समजत नसल्याने साधा खोकला आला तरी लोक औषध घेत आहेत.’’
- विवेक तापकीर, उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough-Based TB Detection Using AI: खोकल्याच्या आवाजावरूनच कळणार क्षयरोग! ‘AI’मुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

SCROLL FOR NEXT