पिंपरी-चिंचवड

संक्रातीसाठी भोगीच्या भाज्या बाजारात दाखल

CD

भोगीच्या भाज्या तेजीत

गाजर, वाटाणा, व काळ्या-पांढऱ्या घेवड्याला मागणी वाढली

पिंपरी, ता. ९ : पाच दिवसांवर संक्रांत आली आहे. संक्रांतीमुळे बाजारात तेजी आली आहे. भोगीच्या भाजीला लागणाऱ्या भाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यातही गाजर, वाटाणा, व काळ्या-पांढऱ्या घेवड्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे घेवडा, वांगी, राजमा आणि गाजराला संक्रांतीच्या मुहूर्तावर चांगलीच मागणी वाढल्याचे मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळभाज्यांमध्ये गवार, टोमॅटो भाव वधारले आहेत. शेवग्याची आवक कमी झाल्याने शेवगा प्रतिकिलो २५० रुपयांनी विकला गेला आहे. तर,
पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी सकाळी गर्दी जास्त होती. त्यामुळे व्यापारी चिंतेत होते. राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जमावबंदी व संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. परंतु, भाजी खरेदीसाठी पिंपरी मंडईत नागरिकांची झुंबड उडाली होती. मंडईतील किरकोळ भाजी विक्रेत्यांना लॉकडाउनची भीती सतावत असल्याचे दिसून आले.

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा : २५-३०, बटाटा : २०-२२, लसूण : ८०-१००,भेंडी : ८०-९०, गवार : १२०-१४०, गवार :१४०-१५०, टोमॅटो : ६०, दोडका : ७५-८०, हिरवी मिरची : ६०, कोल्हापुरी मिरची : ७०-८०, ढोबळी मिरची : ६०-७०, दुधी भोपळा : ४०, लाल भोपळा: २५-३०, काकडी : ३०, कारले : ५०-६०, पडवळ : ५०, परवर : ७०, फ्लॉवर : ६०, कोबी : ४०, वांगी : १००, शेवगा :२२०-२५०, गाजर : ५०, दिल्ली गाजर : ६०, बिन्स : ६०, राजमा : ६०, घोसाळी : ५०, सुरण : ५०, वाल : ६०, आवळा : ५०-६०, तोंडली : ६०,चवळई : १५-२०

पालेभाज्याचे भाव :
कोथिंबीर : १०, मेथी : २०, शेपू : १०-१५, कांदापात : १०, चाकवत : १५, करडई : १०, पुदिना : १०, मुळा- १५, लाल मुळा : २०, पालक १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT