पिंपरी-चिंचवड

बनावट कागदपत्रांद्वारे दिले पाऊण कोटीचे कर्ज

CD

पिंपरी, ता. २३ : बनावट कागदपत्रांद्वारे अनोळखी व्यक्तीला ७४ लाख ९१ हजार रुपयांचे कर्ज मिळवून दिल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह गृह कर्ज विभागातील कर्मचारी , प्रतिनिधी व कर्ज घेणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवडमधील अ‍ॅक्सिस बँक येथे घडला.
याप्रकरणी शिवकुमार महालिंगप्पा बेलुरे (रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड येथील अ‍ॅक्सिस बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, गृह कर्ज विभागातील कर्मचारी, एजंट व अनोळखी व्यक्ती यांनी संगनमताने फिर्यादी यांची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या नावे अनोळखी व्यक्तीला ७४ लाख ९१ हजार रूपयांचे कर्ज दिले. यातून फिर्यादी व बँकेची फसवणूक केली. हा प्रकार १ जानेवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीत घडला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT