पिंपरी-चिंचवड

गुरांचे पाणवठे अडविल्याने सुधागडमध्ये वातावरण तापले

CD

पाली, ता. ६ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक उन्नती वनीकरण आणि वृक्षलागवड संस्थेच्या वतीने वाफेघर येथे बांधकाम सुरू आहे. यामुळे गुरांना पाणवठ्यावर जाणारे रस्ते, गोठण आणि वहिवाट अडविल्याचा आरोप वाफेघर, विडसई ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी ग्रामस्थ सोमवारी (ता. ७) पाली तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

वसुधा संस्थेकडून सरकारी आदेश व नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे, असा आरोप ग्रामस्थ राजेश बेलोसे व सुधीर वाघमारे यांनी केला. त्यांनी सांगितले, की वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेत सुरू असलेल्या बांधकामासंबंधी १० ऑगस्ट २१ रोजी पाली तहसील कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पाली तहसीलदार यांनी कारवाई करून संस्थेचे अनधिकृत बांधकाम पाडले होते. मात्र प्रशासनाच्या या कारवाईनंतरदेखील संस्थेने पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे.
.....
वाफेघर आणि विडसई ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेला सुरू असलेले बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. याबरोबरच येथील वहिवाटीचे रस्ते अडवू नयेत, अशा तोंडी व लेखी सूचना दिलेल्या आहेत. तक्रारदार ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. यापुढे दोन्ही पक्षांना एकत्र बोलावून सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली सुधागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT