पिंपरी-चिंचवड

एसआरए इमारतींसाठी पालिकेचा निधी

CD

मुंबई, ता. १६ : एसआरए योजनेअंतर्गत नव्या इमारतीत गेलेल्या रहिवाशांना आता महापालिकेकडून निधी मिळणार आहे. जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, अंतर्गत रस्तेदुरुस्तीसाठी नगरसेवक निधी किंवा महापालिकेच्या संबंधित खात्याचा निधी वापरावा, अशी ठरावाची सूचना पालिकेच्या आमसभेने मंजूर केली.

एसआरए योजनेतील इमारतींच्या पायाभूत सोयींसाठी पालिकेचा निधी मिळत नव्हता. मात्र या रहिवाशांना हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांचे हाल थांबतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी भाजप उपनेते अभिजीत सामंत यांची ही सूचना होती.

म्हाडा किंवा पीडब्ल्यूडी वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने यापूर्वीच संमती दिली आहे. त्यानुसार एसआरएमधील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी तेथेही महापालिकेचा निधी खर्च करण्याची संमती द्यावी, अशी मागणी सामंत यांची मागणी होती. आता त्यास महापालिकेने मंजुरी दिल्याने यथावकाश सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय अमलात येईल.

विकासाला चालना मिळणार
एसआरएमधील बहुतेक इमारतींची बांधणी सुमार दर्जाची असते व त्यातील रहिवासी हे सामान्य वर्गातील असल्याने दुरुस्तीवरील खर्च त्यांना परवडत नाही. हे सर्व नागरिक पालिकेची पाणीपट्टी, मलनिस्सारण आदींचा कर भरत असतात. पण महापालिकादेखील या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

Ozone Layer Recovery : ओझोन थरात सुधारणा, छिद्र झाले लहान सीएफसीवरील निर्बंधांचा परिणाम ; २०६६ पर्यंत पूर्ण दिलासा मिळण्याची शक्यता

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

SCROLL FOR NEXT