PCMC  sakal
पिंपरी-चिंचवड

Mega Recruitment : पिंपरी महापालिकेत होणार ४२९२ पदांची मेगा भरती

राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली.

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली.

पिंपरी - महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा (Municipal) नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने (State Government) महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल चार हजार २९२ पदांची भरती (Recruitment) करण्यात येणार आहे. महापालिका ही भरती प्रक्रिया स्वतःच राबविणार आहे.

पालिका आस्थापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च ३५ टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका लवकरच नोकरी भरती करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.

अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने भरली जाणार आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात लिपिक, प्रशासन अधिकारी, अभियंता व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रिया स्वतःच राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.

महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. आगामी निवडणूक व आचारसंहिता लक्षात घेता महापालिका प्रशासन आता नोकरी भरती राबविणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

Monsoon Rain Alert Maharashtra : मॉन्सूनचे ढग आणखी दाटले, मुंबई, गोवा, किनारपट्टीवर पावसाची शक्यता; ७ राज्यात पावसाने जोर धरला

SCROLL FOR NEXT