Sakal
पिंपरी-चिंचवड

महामेट्रोच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव

१५ ते १८ या वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोविडचा पहिला डोस महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गुरुवारी आणि शुक्रवारी मिळणार

CD

१५ ते १८ या वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोविडचा पहिला डोस महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गुरुवारी आणि शुक्रवारी मिळणार

पिंपरी - शहरातील विविध केंद्रावरील लसीकरण (Vaccination) कामकाजाची बुधवारी (ता. ५) साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे १५ ते १८ या वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोविडचा (Covid) पहिला डोस (Dose) महापालिकेच्या (Municipal) आठ लसीकरण केंद्रावर गुरुवारी (ता. ६) आणि शुक्रवारी (ता.७) मिळणार आहे. प्रतिदिवशी लसीकरण केंद्रांवर या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे (Covaxin Vaccine) डोस प्रतिदिन ७७५० प्रमाणे देण्यात येणार आहेत.

लसीचा कोटा कोविन ॲपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप पद्धतीने ५० टक्के लाभार्थी असा असणार आहे. वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी कोविडचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसापर्यंतच्या लाभार्थ्यांना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस गुरुवारी (ता. ६), शुक्रवारी (ता. ७) असे एकूण दोन दिवस प्रतिदिवशी ४६ लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन २३००० प्रमाणे कोविड लस देण्यात येणार आहेत.

लसीचा कोटा कोविन ॲपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप पद्धतीने ५० टक्के लाभार्थी या पद्धतीने असणार आहे. (पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी लाभार्थींना प्राधान्य राहील.) बुधवारी (ता. ५) रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील, असे पालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT