पिंपरी-चिंचवड

सेगमेंट निर्मितीच्या कामाला वेग हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, ताथवडे येथे निर्मिती प्रक्रिया सुरू

CD

पिंपरी, ता. १४ : हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी पुणे मेट्रो लाइन-३ मास रॅपिड ट्रान्झिट अंतर्गत कामाला वेग आला आहे. या २३.३ किलोमीटरच्या संपूर्ण मेट्रो प्रकल्पासाठी ८ हजार २३३ सेगमेंटची गरज लागणार आहे.
सेगमेंट निर्मितीची प्रक्रिया ताथवडे येथील कास्टिंग यार्ड येथे सुरू झाली आहे.

‘पीएमआरडीए’च्या हिंजवडी मेट्रोचे सर्व काम पुणे आयटी सिटी मेट्रो रेलतर्फे टाटा-सिमेन्स यांचा संयुक्त भागीदारी तत्वावर सुरु आहे. या कामासाठी हिंजवडीसह गणेशखिंड आणि बाणेर रोड येथे मेट्रोच्या खांबाच्या तयारीसाठी प्राथमिक स्वरूपाची कामे सुरू झाली आहेत. खांबांची उभारणी झाल्यानंतर दोन खांब मोठ्या सेगमेंटने जोडले जाणार आहेत. या सेगमेंटच्या निर्मितीची प्रक्रिया टाटा प्रोजेक्टने दोन महिन्यांपासून सुरू केली आहे. खांबांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन खांब जोडण्यासाठी सुमारे १० ते १२ सेगमेंट्सचा वापर केला जाणार आहे. ३.२ मीटर लांबीच्या एका सेगमेंटचे वजन अंदाजे ५० टनांच्या दरम्यान आहे. हे काम ४० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पीएमआरडीएने ताथवडे येथील १५.६० हेक्टर एवढी यशदाची जागा कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या स्वरूपात घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत सेगमेंट्सच्या निर्मिर्तीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर येथे सेगमेंट निर्मितीसाठी दोन ते अडीच हजार मनुष्यबळ उपलब्ध झाले असल्याने सेगमेंट निर्मितीचे काम अधिक वेगाने होऊ शकणार आहे. कोविड-१९ महामारीमुळे प्रकल्पाच्या कामे सुरु करण्यात विलंब झाल्याचे दिसून आले होते.
----
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे अंतर : २३.३ किमी
एकूण स्टेशन : २३
या मार्गासाठी उभारण्यात येणारे एकूण सेगमेंट : ८२३३
त्यापैकी सेगमेंट तयार : दोन
प्रकल्पाची किंमत : ८३१३ कोटी
प्रवास वेळ : ४५ मिनिटे
---
कोरोनामुळे प्रकल्पाला काही अंशी विलंब झाला होता. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लाइन तीनच्या सेगमेंट निर्मितीच्या कामाला जोरात सुरवात झाली असून, आगामी काळात त्याचा वेग आणखी वाढविण्यात येणार आहे.
-विवेक खरवडकर, मुख्य अभियंता.
फोटो ः 56614

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT