पिंपरी-चिंचवड

ई-कॉमर्स मर्चंट मोड्यूलची स्मार्ट सिटीकडून निर्मिती

CD

पिंपरी, ता. ३० ः शहराचे स्थानिक अर्थकारण बळकट व्हावे, स्थानिकांना रोजगार मिळावा, ग्राहकांना सवलतीच्या दरात उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळावीत, या हेतूने स्मार्ट सिटीने ई-कॉमर्स मर्चंट मोड्यूलची निर्मिती केली आहे. त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन खरेदी-विक्री सुविधासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेस व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पिंपरीत झालेल्या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. विनिता बसंतानी, प्रा. हेमंत राजेस्थ, झमटानी ग्रुपचे अध्यक्ष परमानंद झमटानी, राजन आसवानी, किराणा आणि सुकामेवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम मेघराजानी, रेडीमेड असोसिएशनचे अध्यक्ष नीरज चावला, होलसेल- रेडीमेड आणि होजिअरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश मोटवानी यांच्यासह विश्व सिंधी सेवा संघ, सेंट्रल पंचायत, सिंधू सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, यासाठी स्मार्ट सिटीने ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ मोबाईल अॅप्लीकेशन आणि वेब पोर्टल विकसित केले आहे. त्याद्वारे शहरातील व्यापारी, ग्राहकांना वस्तू खरेदी-विक्री सोयीचे व्हावे, याकरीता ‘ई-कॉमर्स मर्चंट मोड्यूल’ची सुविधा दिली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध होऊन सवलतींचा लाभ मिळणार आहे. व्यापाऱ्यांनाही व्यवसायवाढीसाठी उपयोग होणार आहे. स्मार्ट सारथीचे अभिजीत पाठक, आशिष चिकणे, विवेक पाटील यांनी ई-कॉमर्स मर्चंट मॉडूयलमध्ये नोंदणीबाबत मार्गदर्शन करून सादरीकरण केले. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निराकरण केले. व्यावसायिकांनी ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ वेब पोर्टल आणि मोबाईल अॅपवर नोंदणी करून उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. दीक्षा यादव यांनी सूत्रसंचालन केले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT