Lease-Agreement sakal
पिंपरी-चिंचवड

निवासी पुरावा म्हणून ११ महिने भाडेकरारास मान्यता

यंदा आरटीई प्रवेशासाठी भाडे करार हादेखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

यंदा आरटीई प्रवेशासाठी भाडे करार हादेखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या आदेश दिले आहेत.

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) २५ टक्के कोट्यातील जागांसाठी (Seats) सध्या कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) सुरू आहे. अनेक पालकांचे अर्ज (parents Form) निवासी पुराव्यामुळे (Residential Proof) अपात्र झाले आहेत. परिणामी निवासी पुराव्यामध्ये शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. यात आता निवासी पुरावा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार (Rent Agreement) ग्राह्य धरला जाणार आहे. या बाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. परिणामी, अनेक पालकांना प्रवेशासाठी दिलासा मिळणार आहे.

यंदा आरटीई प्रवेशासाठी भाडे करार हादेखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या आदेश दिले आहेत. पण पालकांना रहिवासी किंवा निवासी पुराव्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत देणे बंधनकारक करण्यात आले होते. भाडेकरार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वीचा असावा तसेच त्याचा कालावधी एक वर्षाचा असणे बंधनकारक असावा, असे सरकारने जाहीर केले होते. पण भाडेकरार हा ११ महिने किंवा २२ महिन्यांचा असतो, अशा परिस्थितीत पालकांना भाडेकरारांमुळे प्रवेशास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश पालकांनी ११ महिन्यांचा भाडेकरार मान्य करण्याची मागणी शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांच्याकडे केली होती. अनेक पालकांनी दूरध्‍वनीद्वारे ही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, अशातच काही पालकांनी भाडेकरार केलेले नाहीत, या पालकांनाही प्रवेशप्रक्रियेत अनेक अडचणी आल्या आहेत. सरकारने यावर काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी पालक संघटनांतर्फे करण्यात आली होती. प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २९ एप्रिल या कालावधीत संबंधित पडताळणी केंद्राकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी व तात्पुरता प्रवेश निश्चित करत आहेत, अशावेळी पालकांना भाडेकरारावरून अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आता प्रवेशासाठी आवश्यक भाडेकरारात शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. निवासी पुराव्यासाठी अकरा महिन्याचा भाडेकरार ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे, याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी नवीन परिपत्रक जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT