बैलगाडा शर्यत  Sakal
पिंपरी-चिंचवड

‘सरकारने गुन्हेमागे घेतल्याने बैलगाडा मालकांना दिलासा’

बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना अनेक बैलगाडा प्रेमींकडून देवी-देवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य सरकारने बैलगाडा शर्यत आयोजकांवरील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. त्याबाबतचा अध्यादेश जारी करत बैलगाडा शर्यत मालकांना मोठा दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

गुन्हे मागे घेतल्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि बैलगाडा शर्यतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेही गव्हाणे यांनी आभार मानले.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. बंदी असताना अनेक बैलगाडा प्रेमींकडून देवी-देवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी आंदोलने झाली होती. आंदोलन केल्यामुळे अनेक बैलगाडा मालक व शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT