पिंपरी-चिंचवड

शैक्षणिक कर्जाच्या बहाण्याने देहूरोडला तरुणीची फसवणूक

CD

पिंपरी, ता. ६ : पाच लाख रुपये शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार देहूरोड येथे घडला. मोनिसा आयुब खान (रा. उर्दू शाळेजवळ, देहूरोड) या तरुणीने फिर्याद दिली आहे.
संजीत ठाकर, जगदीश कुमार नडियाल अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी या शैक्षणिक कर्जासाठी लिंक शोधत असताना डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट लक्ष्मीनारायण एलटीडी डॉट कॉम यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. आरोपींनी त्यांना ऑनलाइन पाच लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी चार्ज, टॅक्सेशन चार्जेस, कंपनीचे सिक्युरिटी चार्ज, आरबीआयचे पाच टक्के व्याज असे ९० हजार ३५० रुपये फोन पे द्वारे आरोपींनी घेतले. त्यानंतर फिर्यादीला कसलेही कर्ज न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT