पिंपरी-चिंचवड

सभापतिपदी काळोखे, मोरे, देहू नगरपंचायतीच्या विविध समितींच्या निवडी जाहीर

CD

देहू, ता. ७ ः देहू नगरपंचायतीच्या विविध विभागाच्या समितीच्या सभापती आणि कार्यकारिणीची निवड विशेष सभेत करण्यात आली. यात बांधकाम समितीच्या सभापतिपदी योगेश काळोखे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सपना मोरे यांची निवड झाली.
हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, गटनेते योगेश परंडवाल व इतर उपस्थित होते.
विविध समिती सभापती व कार्यकारिणीची नावे पुढीलप्रमाणे ः
१) बांधकाम समिती ः सभापती ः योगेश काळोखे, कार्यकारिणी सदस्य- मयूर शिवशरण, पूनम काळोखे, पौर्णिमा परदेशी, प्रवीण काळोखे.
२) महिला व बालकल्याण समिती ः सभापती ः सपना मोरे, सदस्य ः प्रियांका मोरे, मीना कुऱ्हाडे, पौर्णिमा परदेशी.
३) पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती ः सभापती ः सुधीर काळोखे, सदस्य- प्रवीण काळोखे, प्रियांका मोरे, रोहीत काळोखे, पूजा दिवटे.
४) स्वच्छता व आरोग्य समिती ः सभापती ः रसिका काळोखे, सदस्य - ज्योती टिळेकर, शीतल हगवणे, आदित्य टिळेकर, आनंदा काळोखे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी सांगितले, की स्थायी समितीचा सभापती हा नगराध्यक्ष असतो. तसेच विविध समितीचे सभापती हे सदस्य असतात. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण आहेत.
फोटोओळ.योगेश काळोखे(डीयूएच६पी४०१११).
२) सपना मोरे(डीयूएच६पी४०११२).
३) सुधीर काळोखे(डीयूएच६पी४०११३).
४) रसिका काळोखे(डीयूएच६पी४०११४).
५) स्मिता चव्हाण(डीयूएच६पी४०११५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT