पिंपरी-चिंचवड

विक्रीसाठी मेफेड्रॉन बाळगणारा जेरबंद

CD

विक्रीसाठी मेफेड्रॉन जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला शस्त्र विरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ३२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चाकण-तळेगाव मार्गावरील सुदवडीगावच्या हद्दीत करण्यात आली.
नदीम इनायत पटेल (वय ३३, रा. उर्से रोड , तळेगाव, मूळ- सैनिक नगर, मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने भंडारा डोंगरच्या पायथ्याला सापळा रचून पटेलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २७ लाख २० हजार रूपये किंमतीचा २७२ ग्रॅम मेफेड्रॉन तसेच सोळा हजार ७०० रुपयांची रोकड, एक मोटार व दोन मोबाईल असा एकूण ३२ लाख ६१ हजार रूपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपीने हा माल मुंब्रा येथील मुन्नाभाई यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT