पिंपरी-चिंचवड

मार्चअखेर अडीच हजार कोटींची बिले अदा सर्वाधिक स्थापत्यवर खर्च : वायसीएमसाठी १०१ कोटी

CD

पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कामांसाठी नियुक्त ठेकेदाराला सुमारे अडीच हजार कोटींची बिले अदा केली आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार ३६४ कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना दिली आहेत. त्यामध्ये, सर्वाधिक १०५२ कोटी रुपये स्थापत्यच्या ठेकेदारांना व वायसीएमसाठी १०१ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेतील विविध विभागांच्या कामासाठी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार खर्च केला जातो. खर्चामध्ये भांडवली व महसुली खर्चाचा समावेश आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये भांडवली कामासाठी दोन हजार ३६४ कोटी २८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्या संबंधित ठेकेदारांना ३१ मार्चअखेर बिल अदा केले. स्थापत्य विभागासाठी १०५२ कोटी रुपये खर्च झाला. त्यानंतर सर्वाधिक आरोग्यासाठी ३०९ कोटी १६ लाख व भांडार विभागातील ठेकेदारांना २७६ कोटी १६ लाख रुपये तर, पाणीपुरवठा विभागासाठी २९५ कोटी रुपये खर्च झाला आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे चार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यापैकी, दोन हजार ३६४ कोटी रुपयांचे मार्चअखेर बिल अदा केले आहे. तर, महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे ८५० कोटी रुपये खर्च होत आहे. शहरात इंदौर पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्यामुळे, स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. रंगरंगोटी तसेच स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे, यावर्षी आरोग्याच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी ३०९ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च आरोग्य विभागावर झालेला आहे. तसेच, विद्युत विभागासाठी १११ कोटी ७२ लाख व पर्यावरण विभागासाठी ३७ कोटी ७७ लाख रुपये इतका खर्च झाला आहे.
--
वैद्यकीयसाठी दोनशे कोटींची बिले
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या होत्या. कोविड केअर सेंटर, औषधे, नवीन रुग्णालयांमध्ये संसाधने खरेदी केली. तसेच २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये उभारलेल्या सोयीसुविधांची बिले देखील या आर्थिक वर्षामध्ये दिली आहेत. वैद्यकीय विभागावर १०१ कोटी ४७ लाख रुपये खर्च केला आहे. तर वायसीएम रुग्णालयासाठी १०१ कोटी रुपये खर्च झाला आहे.
--
विभागानुसार अदा केलेली बिले
विभाग रक्कम
स्थापत्य १०५२ कोटी
विद्युत १११ कोटी ७२ लाख
पर्यावरण ३७ कोटी ७७ लाख
पाणीपुरवठा २९५ कोटी
भूसंपादन ८० कोटी
भांडार २७६ कोटी १६ लाख
आरोग्य ३०९ कोटी १६ लाख
वैद्यकीय१०१ कोटी ४७ लाख
वायसीएम १०१ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT