पिंपरी-चिंचवड

बैलगाडा शैकिनांसाठी ऊर्सेमध्ये घाट सज्ज

CD

ऊर्से, ता. १० : बैलगाडा शर्यतीचा घाट उभारण्याचा मानस ऊर्से (मावळ) येथील ग्रामस्थांनी एकजुटीने हाती घेत तब्बल दोन महिन्यानंतर भव्य व सुरक्षित घाट तयार झाला आहे. सुमारे २१ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करीत हा घाट तयार करण्यात आल्याने बैलगाडा शौकीनांकरीता सज्ज झाला आहे.

पुणे आणि अहमदनगर जिल्हातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास ४०० वर्षाची जुनी परंपरा आहे. हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे कि ज्यामध्ये शर्यती दरम्यान बैलांना सोडून दिले जाते. यामध्ये बैलांची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्या सोबत नसतो. हीच पारंपरिक कला जोपासण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न केला जात आहे.
पवन मावळातील ऊर्से गाव यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह, बैलगाडा शर्यत व कुस्ती आखाडा यामध्ये नावाजलेले गाव आहे. नुकताच गावाने बैलगाडा घाट तयार करण्याचा चंग बांधाला आणि दोन महिन्यात भव्य, सुरक्षित असा घाट यात्रेकरिता सज्ज झाला आहे. श्री पद्मावती देवी यात्रा उत्सवानिमित्त या नवीन घाटावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून घाट बघण्याकरीता बैलगाडा मालक हजेरी लावत आहे. नव्याने तयार केलेल्या बैलगाडा घाटात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या केल्या उपाययोजना
- शर्यतीचा बैल लांब जावू नयेत यासाठी घाटाच्या शेवटी मुरमाचे कठडे उभारून गोल आळे तयार करण्यात आले आहे. यामुळे बैलांना कोणताही धोका होत नाही.
- स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बैलगाडा दिसावा यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकाम करण्यात आलेले आहे.
- विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

फोटो नं : BBD23B02319, BBD23B02318, BBD23B0232O

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी प्रस्थान

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

SCROLL FOR NEXT