पिंपरी-चिंचवड

पशुधनाचे लसीकरण करण्याचे आवाहन

CD

ऊर्से, ता. ३० : पंचायत समिती मावळ पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व लसीकरण करणेसाठी तालुक्यात फऱ्या व घटसर्प रोग प्रतिबंध लस मुबलक प्रमाणात असून आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल परंडवाल यांनी केले आहे. सध्या फऱ्या व घटसर्प रोगप्रतिबंधक लस तालुक्यासाठी मात्रा ३३ हजार उपलब्ध झाल्या आहेत.

बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा मानवी आरोग्यावर होत असतो. तसाच परिणाम पशुधनाच्या आरोग्यावरही होत असतो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने, हे वातावरण अनेक सुक्ष्मजीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते. या बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी जनावरांचे लसीकरण करून त्यांना तयार ठेवले पाहिजे. सध्या दुग्धव्यवसायाला चांगले दिवस आले असून अनेक शेतकरी हा व्यवसाय करत आहेत. गोपालन करत असताना चांगल्याप्रकारे नियोजन केले तर चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठा गाईसाठी उभारला पाहिजे. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या साथीचे आजार येत असतात त्यामुळेच आजारांवर प्रतिबंधक म्हणून आजार येण्यापूर्वीच लसीकरण करून घेतले पाहिजे. जनावरांना वंध्यत्व येवू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे शासनाच्यावतीने विविध योजना गोपालकांसाठी राबविल्या जातात, त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना उत्तम प्रतीच्या गायी सांभाळत असताना गाईसाठी मुक्तसंचार गोठा उभारावा जेणेकरून गायींचे आरोग्य चांगले राहील.

लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी !
- लाळ्या खुरकूत रोगाविरुद्ध एप्रिलमध्ये लसीकरण केलेले नसल्यास, दोन मिली लसीची मात्रा जनावरांच्या स्नायूमध्ये द्यावी.
- घटसर्प रोगाविरुद्ध अॅलम प्रेसिपिटेड पाच मिली कातडीखाली द्यावे.
- घटसर्प रोगाविरुद्ध स्नायूमध्ये लस देण्यासाठी ऑइल अॅडज्युव्हंटची मात्रा तीन मिली द्यावी.
- फऱ्या रोगाविरुद्ध पाच मिली कातडीखाली लस द्यावी.

लसीची रोगप्रतिकार क्षमता सहा महिने टिकून राहते. सध्या तालुक्यामध्ये २०१९च्या पशुगणनेनुसार मोठ्या पशुधनांची संख्या ५२ हजार आहे. तरी फऱ्या व घटसर्प रोगप्रतिबंधक लस मात्रा तालुक्यासाठी ३३ हजार उपलब्ध झाल्या असून शेतकऱ्यांची मागणी असल्यास तत्काळ लस उपलब्ध होईल, असे जिल्हा स्तरावरून आदेशित केले आहे.

‘‘जनावरांचे लसीकरण वेळच्यावेळी करून घ्यावे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.’’’
- डॉ. अनिल परंडवाल, पशुधन विकास अधिकारी

‘‘मान्सूनपूर्व लसीकरण करणेसाठी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. तालुक्यात सध्या ३३ हजार लस उपलब्ध आहेत.’’
- दीपक राक्षे, तालुका पशुधन पर्यवेक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT