Khadakwasala Dam Water sakal
पिंपरी-चिंचवड

Pavana Dam : पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक

तुरळक पडणाऱ्या पावसामुळे पवना धरण क्षेत्रातील पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसते.

सकाळ वृत्तसेवा

ऊर्से - यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. तसेच तुरळक पडणाऱ्या पावसामुळे पवना धरण क्षेत्रातील पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसते. यावर्षी पवना धरणात केवळ ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा ६५ टक्के इतका होता. तर यावर्षी फक्त ३५ टक्के इतका पाणी पुरवठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास यंदा ३० टक्के पाणीसाठा कमी आहे. ही मावळ व पिंपरी-चिंचवड मधील रहिवाशांसाठी चिंताजनक बाब आहे.

सध्या पडणारा रिमझिम पाऊस शेतीच्या कामासाठी व पिकासाठी महत्त्वाचा ठरत असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेली चार पाच दिवसापासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘पवना धरण क्षेत्रात सध्या असलेला पाणीसाठा हा मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ३० टक्के कमी आहे. ही चिंताजनक बाब असून जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये भरून निघणे महत्वाचे ठरणार आहे.’

- समीर मोरे, शाखा अभियंता पवना धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

Uruli Kanchan Rain : उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साठण्याने वाहतुकीला अडथळा

Pune Rain : पुण्यात पावसाची शक्यता नाहीच; प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र

Katraj News : कात्रज घाट आणि वनपरिक्षेत्रात मेडिकल वेस्टेजचे ढीग;पर्यावरण व वन्यजीवांसमोर गंभीर धोका

TET Exam : ‘टीईटी’ परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT