पिंपरी-चिंचवड

पवन मावळातील आठ गावांना बसही मिळेना

CD

ऊर्से, ता. ४ : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सुरू झाली. पण, लगतच्या पवन मावळातील गावांसाठी एसटी किंवा पीएमपीची बसही मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरांत जाण्यासाठी येथील नागरिकांना फरफट सहन करावी लागत आहे.
पवन मावळातील पाचाणे, पुसाणे, आढले बुद्रुक, आढले खुर्द, दिवड, ओवळे, डोणे येथील नागरिकांना पुणे व पिंपरी चिंचवड, हिंजवडी आदी भागांत जाण्यासाठी कुठलीच शासकीय वाहतूक व्यवस्था अजनूही मिळालेली नाही.
या आठ गावांमध्ये काही वर्षांपूर्वी शिवाजीनगर ते ओवळे अशी एसटी बससेवा सुरू होती. परंतु, पीएमपीची चिंचवड ते चांदखेड बस सुरू झाल्याने कासारसाईपासून प्रवासी एसटी बसने जाणे टाळू लागले. त्यामुळे ती सेवा बंद करण्यात आली. या आठ गावांतील तरुण हिंजवडी येथे रोजगारासाठी, तर विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी जातात. परंतु त्यांना बसपर्यंत पाच ते सहा किलोमीटर जावे लागते. त्यासाठी अन्य वाहनांना हात दाखवून थांबवत चांदखेड किंवा कासारसाईपर्यंत जावे लागते. या स्थितीमुळे काही मुलींनी दहावीनंतरचे शिक्षणही सोडले आहे. या भागासाठी चिंचवड ते राजेवाडी अशी पीएमपी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी येथील नागरिक २०१५ पासून करत आहेत. पण, मागील दहा वर्षांपासून या नागरिकांना एकही बस देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ‘‘हा ग्रामीण भाग आहे. बससंख्या कमी आहे. कर्मचारी अपुरे आहेत, त्यामुळे बस सोडणे अडचणीचे आहे’’ अशी कारणे प्रशासन देत आहे.

ग्रामपंचायतींचे ठराव
हिंजवडी आयटी पार्क पंधरा किलोमीटर आहे. शेजारच्या मुळशीतील दुर्गम गावांमध्ये पीएमपीची बस धावते. तरीही, या गावांमध्ये बस येत नाही. या मार्गांवर दिवसातून कमीत कमी चार फेऱ्यांमध्ये बस सुरू करावी किंवा चांदखेड मार्गावरील बसच्या चार फेऱ्या या गावांपर्यंत वाढवाव्यात, अशी मागणी या आठ गावांतील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन करण्यात आली आहे.

पवन मावळातील या आठ गावांसाठी बससेवा सुरू करावी, यासाठी सर्व ग्रामपंचायतींचे ठराव घेतले आहेत. ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन पीएमपीएमएलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांना दिले आहे.
- सुमित ओव्हाळ, युवा कार्यकर्ते, पुसाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT