पिंपरी-चिंचवड

चुकीचे बॅरिकेड्‍स लावल्याने ऊर्से खिंडीजवळ अपघाताचा धोका वाहनचालकांची तारेवरची कसरत बॅरीकेटमुळे अपघाताचा धोका वाहनचालकांची तारेवरची कसरत

CD

ऊर्से, ता. १६ ः ऊर्से खिंडीतून तळेगावकडे जाणाऱ्या चौकातील बॅरिकेड्‍स चुकीच्या ठिकाणी लावल्याने ग्रामस्थांना लांबून ‘यू टर्न’ घेऊन जावे लागत आहे. वाहनचालकांना धोकादायकपणे कसरत करून जावे असल्याने येथील बॅरिकेड्‍स लवकरात लवकर हलवावेत, अशी मागणी सात गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
उर्से खिंडीतून तळेगावकडे जाण्यासाठी धामणे, परंदवडी, बेबडओहोळ, आढे, ओझर्डे, सडवली व ऊर्से या गावांतील ग्रामस्थ दररोज वाहतूक करत असतात. त्यामधील बहुसंख्यांना दररोज चार ते पाच वेळा आपापल्या कामासाठी ये-जा करावी लागते. प्रामुख्याने दूध व्यावसायिक, शालेय विद्यार्थी, कंपनीतील कामगार, व्यावसायिक यांची सतत रहदारी सुरू असते.
ग्रामस्थांना लांबून ये-जा करणे शक्य नसल्याने वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन घेऊन तळेगावकडे जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. इथे अपघात झाल्यावर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का ? अपघात झाल्यावरच बॅरिकेड्‍स काढले जाणार का ? या ठिकाणी वाहतूक पोलिस असताना देखील बॅरिकेड्‍स कशासाठी लावले जात आहेत ? असाही सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

बॅरिकेड्‍स लावण्याची कारणे...
- वडगाव - तळेगाव चौकात वाढती वर्दळ
- ऊर्से गावाकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे होणारी अडचण
- चौकात चारी बाजूने असलेली वाहतूक
- ऊर्सेकडून येणारी वाहतूक वळविणे

BBD25B03291

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT