पिंपरी-चिंचवड

वारू, चावसर, शिळिंब केंद्रांतील शिक्षकांची ‘शिक्षण परिषद’ उत्साहात

CD

ऊर्से, ता. २६ : केंद्र वारू, चावसर आणि शिळिंब या तीन केंद्रांतील शिक्षकांची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषद वारू येथे उत्साहात पार पडली. या परिषदेचा उद्देश निपुण भारत अभियानाअंतर्गत विविध उपक्रम व शैक्षणिक कार्यपद्धतींबाबत सखोल विचारविनिमय व मार्गदर्शन करणे हा होता. कार्यक्रमाचे प्रमुख विस्तार अधिकारी संदीप काळे होते. केंद्रप्रमुख सुनंदा दहीदुले, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद विषय सुलभक म्हणून नेहा कुलकर्णी, सुनिता देशमुख, राहुल वाकचौरे आणि संजय ठाकरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत तीन शाळांमधील एकूण २८ शिक्षक उपस्थित होते. परिषदेत निपुण महाराष्ट्र मिशन अंतर्गत शैक्षणिक धोरणे, उद्दिष्टे व प्रशासनाच्या भूमिकेबाबत अत्यंत सखोल व समर्पक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शिक्षकांना प्रेरणादायी प्रास्ताविकात शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, शाळेतील गुणवत्ता वाढीबाबत मौलिक विचार, विषयतज्ज्ञांनी निपुण भारत कृती आराखडा, मूल्यांकन प्रक्रिया, वाचन-लेखन व गणितातील निपुणतेसाठी आवश्यक बाबी (शैक्षणिक साधने) यांचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. ही परिषद माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. सहभागी शिक्षकांनी एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण करत नवे विचार घेतले आणि निपुणतेच्या दिशेने सामूहिक वाटचालीचा संकल्प केला. ही परिषद शिक्षण, संवाद व सहकार्याच्या उत्कृष्ट पातळीवर ठरली. नितीन वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर संजय ठाकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT