पिंपरी-चिंचवड

‘परंदवडी-सोमाटणे रस्त्यावरील खड्डे बुजवा’

CD

ऊर्से, ता. ३१: परंदवडी-सोमाटणे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहने चालवताना अपघाताची शक्यता निर्माण होत असल्याने ग्रामस्थांकडून खड्डे बुजवण्याची मागणी केली जात आहे.
परंदवडीतून ऊर्सेकडे वळताना आणि परंदवडी-सोमाटणे मुख्य रस्त्यावर खड्ड्यांची संख्या अधिक आहे. हे खड्डे नजरेस न पडल्याने वाहने थेट त्यामध्ये आदळत असून, त्यातून वाहनांचे नुकसान व अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका अधिक असल्याची स्थिती आहे.
सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, अनेक नागरिक सहकुटुंब मिरवणुका व देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत, अशावेळी रस्त्यांची ही दयनीय अवस्था गंभीर समस्या ठरू शकते.
ऊर्से व बेबडओहळ परिसरात औद्योगिकीकरणामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे खडी व मुरूम टाकून बुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हे खड्डे आकाराने मोठे व धोकादायक असून, वाहन चालवताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT