पिंपरी-चिंचवड

अंतर्गत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम

CD

ऊर्से, ता. १७ : धामणे येथे प्रकल्प संचालक आत्मा पुणे व तालुका कृषी अधिकारी मावळ यांच्या वतीने २०२५-२६ या वर्षात आत्मा योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण’ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश यादव यांनी नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेती कशी करावी? माती परीक्षणाचे महत्त्व, माती नमुना कसा काढावा, रब्बी हंगामातील पीक नियोजन, खते, जैविक फवारणी, नैसर्गिक शेतीचे फायदे, ऊस व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तर राहुल घोगरे यांनी आत्मा योजने अंतर्गत प्रशिक्षण व योजनेबाबत माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित उप कृषी अधिकारी मिनाज शेख यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल माहिती दिली. प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड, सरपंच सोमेश गराडे व ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी खंडागळे, पप्पू गराडे, नाना गराडे व कृषी सखी अंजना गराडे, कविता गराडे यांनी केले.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, तज्ञ शेतकरी तयार करणे, रासायनिक खताचा वापर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- डॉ. योगेश यादव शास्त्रज्ञ, कृषी विस्तार केंद्र नारायणगाव

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योजनेबाबत माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रम, माती नमुने तपासणी काढणे, महाविस्तार एआय ॲप डाऊनलोड करणे, कृषी विभागाच्या योजना राबविणे याबाबत माहिती दिली.
- सोमेश गराडे, सरपंच धामणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT