पिंपरी-चिंचवड

देवस्थान इनाम जमीन कृती समिती आक्रमक

CD

ऊर्से, ता. ४ : देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनीच्या मालकी हक्काचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जमिनींच्या हक्कासाठी देवस्थान इनाम जमीन कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांबाबत समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले.
अशा जमिनी तातडीने खालसा करून देवस्थान सेवा वंशपरंपरेने बजावणाऱ्या मूळ सनदधारक पुजारी व सेवाधाऱ्यांच्या नावावर मालकी हक्काने वर्ग कराव्यात ही समितीची प्रमुख मागणी आहे. देवस्थानच्या गाभाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर पुजारी व सेवाधाऱ्यांचा हक्क निश्चित करावा, अशीही मागणी आहे.
यावेळी अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी पुजारी समाजाच्या देवस्थान इनाम जमिनींबाबत समाजावर होणारा अन्याय, राज्य सरकारच्या निर्णयात काय सुधारणा अपेक्षित आहे, याविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाघमारे, देवस्थान समिती प्रमुख धनंजय दरे, कैलासआबा शेलार, सतिश पाटील, प्रदिप पाटील, शिवानंद बिराजदार, पुनम गुरव, शंकर शिर्के, उमेश गुरव, बाळासाहेब शिंदे, नवनाथ देशमुख, चंद्रकांत शिंदे, प्रविण भालेराव, महेश आगलावे, राजु घनवट, ॲड. संतोष गुरव, संकेत वाघमारे यांच्यासह गुरव पुजारी, ब्राह्मण, गिरी गोसावी, गोंधळी तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते. पुढील आंदोलनाची दिशा २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात निश्चित केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Volkswagen Layoffs 2026: Volkswagen मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात; आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कारचे मॉडेलही निम्मे होणार; नेमकं प्रकरण काय?

Baramati News: डोर्लेवाडीत सभागृह, मंदिराच्या जागेवरून दोन गट आमनेसामने; तणावामुळे मोठा पोलिस बंदोबस्त

'ड्रायव्हर काकांनी मला त्रास दिला...' ३ वर्षीय चिमुकलीची आजीकडे तक्रार; नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : जागतिक ऊर्जा दरवाढीत डिझेल ठरतोय ‘गेमचेंजर’; कच्च्या तेलापेक्षा डिझेलच्या विक्रमी किमतींची खरी चिंता

Raireshwar Tourism: रायरेश्वर पठारावर फुलला रानफुलांचा बहर; पर्यटकांना खुणावतेय निसर्गसौंदर्याची पर्वणी

SCROLL FOR NEXT