पिंपरी-चिंचवड

रस्त्यावरील चरीत वाहने अडकून अपघात भोसरीतील प्रकार ः पाण्याचा निचरा होण्याचा उपाय ठरतोय जीवघेणा

CD

भोसरी, ता. १० ः येथील पीएमटी चौकातील रस्त्यावर साचत असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेद्वारे गटारापर्यंत चर खोदून पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र, या चरीत आठवडाभरात नऊ दुचाकी अडकून पडल्याने वाहन चालकांना दुखापत झाली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने शोधलेला उपाय वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील विविध रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी घाईघाईत डांबरीकरण केले. मात्र ते करताना रस्त्यांची पातळी योग्य प्रमाणात साधली नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांवरच पाणी जमा राहत आहे. भोसरीतील पीएमटी चौकातील रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत होते. हे टाळण्यासाठी महापालिकेद्वारे येथे गटारापर्यंत चर खोदण्यात आली. मात्र, या चरीत दुचाकीचे चाक अडकून वाहन पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रविवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून जाणारे एक दांपत्य पडून वाहन चालकाला पायाला दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे येथे गटाराचे चेंबर फोडल्याने त्याचे लोखंडी गज वर आले आहेत. त्यामुळे वाहनांची चाकेही पंक्चर होत आहेत. आतापर्यंत या चरीत अडकून नऊ दुचाकी चालकांना अपघात झाला आहे. पावसाचे पाणी साचल्यावर चर दिसत नसल्याने वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चर तातडीने भरून पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची मागणी येथील दुकान चालक राहुल सोनकुळे, मित्तल लुंकड, अमित लुंकड, अमोल भोईटे, मारुती लांडगे आदींनी केली आहे.


कोट
‘‘मी पीएमटी चौकातून भोसरी गावठाणाकडे जात असताना दुचाकीचे चाक रस्त्यावरील चरीत अडकून झटका बसल्याने हाताला दुखापत झाली आहे.
-संतोष तोतरे, आळंदी
----------------
‘‘पीएमटी चौकातील रस्त्यांची पाहणी करून, पाण्याचा निचरा होण्यासाठी चर बुजवून अन्य उपाययोजना केली जाईल. यासाठी स्थापत्य विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास घटनास्थळी पाठवले जाणार आहे.
-शैलेंद्र चव्हाण, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय

दिघी रस्त्यावरही खड्डे
भोसरीतील दिघी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन टाकण्याच्या कामासाठी जेसीबीच्या पोकलेनद्वारे रस्त्यावर खोलवर खड्डे खोदण्यात आले आहेत. पावसामुळे या भागात पाइपलाइन टाकण्याचे काम बंद करण्यात आले. मात्र पोकलेनद्वारे रस्त्यावर खोदलेले खड्डे तसेच राहिल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.

फोटोः 01209, 01210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT