पिंपरी-चिंचवड

महापालिकेकडून गवळीनगरमधील सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती

CD

भोसरी, ता. १ ः गवळीनगरमधील सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबून चेंबरमधून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांडपाणी वाहिनीच्या तुंबलेल्या चेंबरची दुरुस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गवळीनगरमध्ये सुमारे पन्नास कुटुंबांच्या घरासमोरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. त्यामुळे येथील नागरिकांचे घरात बसणे अवघड झाले होते. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. एक महिन्यांपासून सांडपाणी वाहिनी तुंबण्याचा प्रकार सुरू होता. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे येथील नागरिक आजारी पडण्याच्या घटनेतही वाढ झाली होती. महापालिकेच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना येथील नागरिक वारंवार तक्रार करत होते. ‘सकाळ’मध्ये या विषयाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेने तातडीने येथील सांडपाणी वाहिनीच्या तुंबलेल्या चेंबरची दुरुस्ती केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा फटका लोकल सेवेला; तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने...

Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT