Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Mumbai Weather Update: हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे महानगरपालिकेकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Mumbai Weather Update

Mumbai Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाचा हाहाकार सुरूच असून भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आणि मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत सरासरी १०० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली असून, आजही मुंबई व उपनगरात काही ठिकाणी 'अत्यंत तीव्र' पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com