भोसरी, ता. ७ : एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त भोसरीतील रिलिफ फाउंडेशन आणि मोशीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानभक्ती महाविद्यालय, डुडुळगावातील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय आयसीटीसी यांच्याद्वारे मोशीत जनजागृती फेरी व मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी नारी संस्थेतील वैज्ञानिक डॉ. प्राजक्ता कडाळे यांनी ‘एचआयव्ही : समज-गैरसमज’ या विषयावर व्याख्यान देऊन नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी जनजागृती केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.एम. चौधरी, एमबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय बागूल, उपप्राचार्य एन. डी. भालेराव, डॉ. देवदत्त शेळके, प्रा. धनश्री कुतवळ, रिलिफ फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक अंजली नाटेकर-जमादार, सल्लागार किरण डोळस, डी. वाय. पाटील आयसीटीचे सल्लागार गणेश लोमटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी काढलेल्या जनजागृती प्रभात फेरीत ज्ञानभक्ती महाविद्यालय, स्कूल ऑफ नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट रिसर्च आदी महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी फलक व घोषणांद्वारे नागरिकांमध्ये एड्सविषयी जनजागृतीही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.