भोसरी, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोसरीतील संत सेना महाराज मंदिरात त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. रणमर्द शिलेदार शस्त्र आणि शास्त्र जपणारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शस्त्र पूजन केले. या वेळी व्याख्याते इंद्रजीत भोसले यांचे शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झाले. विशाल वाळुंजकर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती सांगितली. यावेळी महिलांनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. नीलेश गायकवाड, नागेश भोपुलकर, भाऊसाहेब यादव, कुंडलिक काळे, अशोक पंडित, रमेश गांगुर्डे, हरिभाऊ शेळके, प्रमोद रसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सोमनाथ शिंदे, मनोज विळस्कर, गणेश भोंडेकार, राहुल जगताप, भूषण सोनवणे, तेजस पंडित आदींनी परिश्रम घेतले. पुंडलिक सैंदाणे यांनी प्रास्ताविक केले. नितीन कुटे यांनी सूत्रसंचालन केले. श्री संत सेना महाराज मंदिराचे अध्यक्ष मुरलीधर रायकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.