पिंपरी-चिंचवड

दिघीतील भाजी मंडईचा प्रश्न अधांतरी

CD

संजय बेंडे - सकाळ वृत्तसेवा

भोसरी, ता. १९ ः दिघीगाव परिसरात एकीकडे जागोजागी भाजी आणि फळविक्रेत्यांनी अतिक्रमणे केली असताना दुसरीकडे भाजी मंडईसाठी स्वतंत्र आरक्षित भूखंडच नसल्याचे उघड झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका लक्षात घेऊन रस्त्यावरील विक्रेत्यांना वडमुखवाडी येथील पदपथावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. मात्र, ते सर्वांनाच गैरसोयीचे ठरणार असल्याची भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली असून दिघीतच जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघी गावाचा १९९७ मध्ये समावेश झाला. त्यानंतर दिघीने गावपण जपत शहरीकरणाकडे झपाट्याने वाटचाल सुरू केली. दिघी परिसरात आता टोलेजंग इमारती उभ्या राहत असतानाही अद्यापपर्यंत दिघीकरांच्या भाजी मंडईचा प्रश्न प्रश्न सुटलेला नाही. मंडईसाठी भूखंडही आरक्षित नसल्याने दिघीकरांना वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला तोंड देत रस्त्यावरच्या भाजी मंडईवर अवलंबून राहावे लागत आहे.

जागोजागी अतिक्रमणे...
दिघीमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते भारतमाता नगराकडे जाणारा रस्ता, आदर्शनगर रस्ता, पुणे-आळंदी रस्त्यावर शहीद संदीप कामठे सैनिक भवन परिसर, जुना जकातनाका ते बोपखेलकडे जाणारा रस्ता, भोसरी-आळंदी रस्त्यावर कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यान ते मॅगझीन चौक आदी भागांत भाजीपाला आणि फळे विक्रेते बसतात. काही विक्रेत्यांनी हातगाडी; तर काहींनी रस्त्याच्याकडेला बसणे पसंत केले आहे.

दररोज होतेय कोंडी
मुळातच दिघीतील प्रमुख असणारा आदर्शनगर, छत्रपती संभाजी महाराज चौक व ते विठ्ठल मंदिराकडे जाणारा रस्ता, भारतमाता नगरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पदपथांचा अभाव आहे. त्यातच फळे-भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात. त्याचप्रमाणे ग्राहकही रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन संध्याकाळच्यावेळेस वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे दिघीतील भोसरी-आळंदी रस्ता हा प्रचंड वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरही मॅगझीन चौकापर्यंत फळे-भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिघीमध्ये भाजी मंडई नाही. त्याचप्रमाणे भाजी मंडईसाठी आरक्षित भूखंडही नसल्याने भाजी मंडई उभारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिघीतील रस्त्याच्याकडेला अतिक्रमण केलेल्या भाजी विक्रेत्यांना वडमुखवाडीतील पालखी मार्गाजवळील पदपथावर जागा देण्यात येणार आहे.
- राजेश आगळे, ई प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

भाजी-फळे विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आम्हाला दिघीतच जागा देणे गरजेचे आहे. वडमुखवाडीत जागा दिल्यास दिघीतील ग्राहक त्या ठिकाणी येणे अशक्य वाटते. त्यामुळे महापालिकेने दिघी परिसरातील फळे-भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करावे.
- एक भाजी विक्रेता, दिघी

दिघीपासून वडमुखवाडीचे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे. त्यामुळे दिघीतील भाजी विक्रेत्यांना वडमुखवाडीत स्थलांतरीत केल्यास दिघीकरांना भाजी खरेदी करणे गैरसोईचे होणार आहे. त्यामुळे महापालिकेने दिघीच भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
- रघुनाथ जाधव, नागरिक, दिघी

रस्त्याच्या प्रश्न सुटला, आता मंडई कधी ?
दिघीला भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी संत निरंकारी भवनाजवळून जवळचा रस्ता होता. मात्र या-ना त्या कारणांनी हा रस्ता मूळ जागा मालकांद्वारे वारंवार बंद केला जात होता. त्यामुळे दिघीकरांना मॅगझीन चौकमार्गे सुमारे साडेतीन किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत होते. सुमारे ३० वर्षांनंतर रस्त्याचा प्रश्न सुटून दिघीकरांसाठी निरंकारी भवनाजवळील रस्त्याबरोबरच भारतमाता नगरातून आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता सुरू झाला
आहे. त्याचप्रमाणे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमा भिंतीजवळील रस्ताही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे दिघीकरांचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे, मात्र त्यांना आता मंडईचा प्रश्न कधी सुटणार याची प्रतीक्षा लागली आहे.

इंद्रायणीनगरात भाजी मंडई रिकामीच!
दिघीमध्ये भाजी मंडई नसल्या कारणाने दिघीकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र भोसरीतील इंद्रायणीनगरात भाजी मंडई तयार असूनही तेथे भाजी विक्रेते बसत नसल्याने गाळे रिकामे पडले आहेत. या भाजी मंडईच्या वाहनतळात भाजी-फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे ग्राहकांना रस्त्याच्याकडेला वाहने लावावी लागत आहे, असे असताना महापालिका भाजी विक्रेत्यांना त्यांना मिळालेल्या गाळ्यात बसवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT