पिंपरी-चिंचवड

नामवंत हिंद केसरी, भारत केसरी मल्ल झुंजणार

CD

भोसरी, ता. १० ः भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या उत्सवात हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या निकाली कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना मिळणार आहे. चांदीच्या गदेसह सुमारे १२ लाखाहून अधिक रोख रकमेची बक्षिसांची उधळणही करण्यात येणार आहेत.
भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव १५ व १६ एप्रिल रोजी होणार आहे. वस्ताद कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे आखाड्यात बुधवारी (ता. १६) कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. त्यासाठी कुस्त्यांचे जोड ठरविण्यात आले आहेत. ‘भैरवनाथ केसरी’ किताबासाठी भारत केसरी मल्ल वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये लढत होणार आहे. ‘भोजापूर केसरी’साठी महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद सिकंदर शेख आणि हरियाणाचा हिंद केसरी अभिषेक गुज्जर यांच्यामध्ये लढत आहे; तर ‘वस्ताद केसरी’ किताबासाठी महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि महाराष्ट्र केसरी (ग्रीको) शुभम शिंदनाळे यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. ‘नाथसाहेब केसरी’ किताबासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हे लढत देणार आहेत. महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, उपहिंद केसरी तुषार डुबे आणि उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे, ऑल इंडिया चॅम्पियन आकाश माने आणि एशियन चॅम्पियन संजय तनपुरे, महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध व हनुमंत पुरी यांच्यामध्ये रोमहर्षक लढती होणार आहेत. त्याचप्रमाणे समाज माध्यमावर प्रसिद्ध असलेला मल्ल देवा थापा आणि हरियाणाचा पवन यांच्यामध्ये आकर्षक लढत होणार आहे.
गावजत्रा मैदान आणि बैलगाडा घाटाच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रंगरंगोटीही करण्यात आली आहे. उत्सव प्रमुख जंगल फुगे, माजी नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, पंडीत गवळी, भानुदास फुगे, शेखर लांडगे, गणपत गव्हाणे, राणू कंद, सुदाम माने, मच्छिंद्र लांडगे, मदन गव्हाणे, विलासराव फुगे, नारायण गव्हाणे आदींसह ग्रामस्थांनी या कामांची पाहणी केली.


आणखी कोणत्या लढती होणार ?
शुभम थोरात विरुद्ध महेश कुंभार, अमित कंधारे विरुद्ध अक्षय पवार, सागर राऊत विरुद्ध मुन्ना हिंगे, योगेश तपकीर विरुद्ध केतन घारे, महेश जाधव विरुद्ध संकेत माने, युवराज खोपडे विरूद्ध आदित्य काळभोर, निखिल वाघ विरुद्ध अनिकेत मगर, स्वराज काळभोर विरुद्ध प्रजोत टाकळीकर, अजिंक्य सांडभोर विरुद्ध यश नखाते, ओम नखाते विरुद्ध आर्यन मुळे, अभिषेक जाधव विरुद्ध ओंकार ढेकळे.


BHS25B02760, BHS25B02761

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT