भोसरी, ता. १० ः क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात व्याख्याने, भीमगीते, प्रवचन, सांस्कृतिक आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरमधील आदर्श समाज विकास संघाद्वारे शुक्रवारी (ता.११) महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून जयंती महोत्सवाला सुरूवात करण्यात येणार आहे. रविवारी (ता.१३) इंद्रायणीनगरमधील श्री तिरुपती बालाजी चौकात (सहारा चौक) सायंकाळी ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर होणार आहे. त्याचप्रमाणे शीतल यशोधरा यांचे संविधान जगलेली सावित्री-जोति या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता धम्मनिनाद बुद्धविहारात पंचशील ध्वजवंदनानंतर दुचाकी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संध्याकाळी महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. भोसरीतील आळंदी रस्त्यावरील विक्रमशिला प्रबोधिनीमध्ये रविवारी (ता. १३) सायंकाळी चार वाजता लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तर महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.१४) सकाळी साडेदहा वाजता डॉ. दीपाली दहिंजे, डॉ. हेमांगी कडलक, डॉ. मिलिंद वाकोडे, विनय दवे समाज प्रबोधन करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता अंध कलाकारांचा सुरसरगम सुराली बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक चारमधील धम्मदीप बुद्धविहारात शुक्रवारी (ता.११) सायंकाळी सहा वाजता व्याख्याते दत्तात्रेय शिंदे यांचे महात्मा फुले जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. भोसरीतील पीएमटी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या जयंती महोत्सवाची सुरूवात शुक्रवारी (ता.११) सायंकाळी सात वाजता व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांच्या फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.