भोसरी, ता. १५ ः भोसरी, दिघी परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. विविध संस्था-संघटनांकडून चित्रकला, निबंध स्पर्धा; तर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, अंधः कलाकारांचा भीम-बुद्ध गीतांचा सूर सरगम, सरबत वाटप, फळे, साहित्य वाटप करण्यात आले.
दिघीतील विक्रमशिला प्रबोधिनीमध्ये डॉ. विनय दवे, डॉ. दीपाली दहिंजे, हेमांगी कडलक यांचे व्याख्यान झाले. सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष निखिल रोहिणीकर, सचिव प्रवीण पुणेकर, खजिनदार गोरखनाथ वाघमारे, राजू कांबळे, उत्सव समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला भारसाकळे, छाया गाडे आदी उपस्थित होते.
लहान मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा तर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. अंध कलाकारांचा भीम- बुद्ध गीतांचा सूरसरगम सुराली कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी कांबळे, सुमित्रा ठोसर, ललिता अवसरमोल, वैशाली लोंढे, सुजाता पवार, चंदा सुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.
सरबत वाटप
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील संविधान चौकात सरबत वाटण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, महेश निंबाळकर, योगेश लांडगे, महेश डोंगरे, स्वप्नील ओव्हाळ, रेखा ओव्हाळ, प्रशिल ओव्हाळ, किरण ओव्हाळ आदी उपस्थित होते. राहुल ओव्हाळ, रोहित ओव्हाळ, राजेंद्र ओव्हाळ, दिलीप ओव्हाळ आदींनी संयोजन केले.
फळे, सहित्य वाटप
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलोखा सोशल फाउंडेशन व शाह जमात शान ए फकीर फाउंडेशनद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ईदनिमित्त नागरिकांना सफरचंद, लिची, द्राक्षे, मॅंगो, पाण्याची बाटली आदी साहित्य वाटण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक हरिश डोळस, जमात शान ए फकीर संस्थेचे अध्यक्ष मोहसीन शाह, सुहास खाडे, गौरी शेलार, राहुल गवळी, राजेंद्र डोळस आदी उपस्थित होते.
मजूरांना नाश्त्याचे वितरण
पिंपळे गुरव ः संविधान चौकातील मजूर नाक्यावर रोजीरोटी मिळविण्यासाठी मेहनत करणाऱ्या कष्टकरी कामगारांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांना फळे व नाश्ता वाटण्यात आला. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे प्रतिनिधी संजय मराठे,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जंगम, उद्योजक शैलेश थोरात, राम मगर, विशाल धुमाळ, तुषार जांगर, संतोष भालेराव, अर्जुन पुरी, अनिल मिसाळ, अक्षय नांगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्राट मित्र मंडळाचा आकर्षक देखावा
वाकड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हातात राज्यघटना घेऊन संसदेत लाल दिव्याच्या मोटारीतून जात असल्याचा दुर्मिळ फोटोचा देखावा सम्राट मित्र मंडळाने साकारला. हा देखावा मुख्य आकर्षण आणि कौतुकाचा विषय ठरला. या देखाव्यापुढे फोटो काढण्यासाठी भीम सैनिकांसह सर्वांचीच दिवसभर मोठी गर्दी होती. मुख्य संयोजक व आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष अविनाश शिरसाठ, उपाध्यक्ष सुजित कांबळे, खजिनदार विशाल शिंदे, उत्सव प्रमुख अमित वाघमारे, विशाल वाव्हळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी चोख नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.