भोसरी, ता. १८ : येथील दिघी रस्त्यावरील संत निरंकारी भवनाजवळ जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता सोमवारपर्यंत (ता.२१) रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी दिघीकडे ये-जा करण्यासाठी आळंदी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहनही पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.
दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमा भिंतीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने यापूर्वीच पूर्ण केले आहे. मात्र, गंगोत्री पार्क जवळील काम करणे अपूर्ण होते. ते आता सुरू करण्यात आले आहे. सहाशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी येथे काम सुरू करण्यात आले आहे.
गंगोत्री पार्क ते संत निरंकारी भवनासमोरील रस्त्यावर जलवाहिनी टाकणे सुरू करण्यात आले आहे. यासाठी भोसरी-दिघी रस्ता बंद करण्याची परवानगी यापूर्वीच घेतली आहे. हे काम येत्या तीन दिवसांत पूर्ण होईल.
- शेखर गुरव, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ‘ई’ क्षेत्र कार्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.