भोसरी, ता. २७ ः रात्रभर पडलेल्या पावसाने भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरातील रस्त्यांवर आणि सखल भागांत मंगळवारी (ता.२७) मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही भागांत चारपेक्षा अधिक दिवस पावसाचे पाणी साचून राहिल्याने डास आणि रोगजंतूंचा त्रास वाढल्याच्या नागरिकांकडून तक्रार करण्यात आल्या. तर पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.
कोणत्या सखल भागांत पाणी साचले ?
इंद्रायणीनगर : नाना - नानी पार्क, भाजी मंडईजवळील भूखंड, संतनगर बस थांब्याजवळील भूखंड
भोसरी : धावडे वस्तीजवळील गावजत्रा मैदान, आळंदी रस्त्यावरील बनाच्या ओढ्याजवळील भूखंड
दिघी : महापालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज विद्यालयाजवळील भूखंड, पुणे-आळंदी रस्त्यावर जुना जकात नाका ते बोपखेल फाट्यापर्यंतच्या रस्ता
साचलेल्या पाण्यामुळे समस्या
- परिसरात दुर्गंधी पसरली
- डास आणि रोगजंतूंच्या संख्येत वाढ
- डेंगी आणि चिकन गुनिया आजारांचा धोका
- नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
या रस्त्यावर पडले खड्डे
भोसरी : पुणे - नाशिक महामार्गावर एमआयडीसी चौक, लांडेवाडीतील टेल्को रस्ता, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, गंगोत्री पार्क, भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळील रस्ता, चक्रपाणी वसाहत रस्ता, आदिनाथनगरातील भोजापूर पीपल इंटरनॅशनल स्कूलपासून रामनगरीकडे जाणारा रस्ता
इंद्रायणीनगर : पेठ क्रमांक दोनमधील मोरया चौक, भाजी मंडईसमोरील रस्ता, पेठ क्रमांक सातमधील यशवंतराव चव्हाण चौक, संजीवनी कॉलनीसमोरील रस्ता
दिघी : सह्याद्री कॉलनी क्रमांक तीन समोरील रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिरापर्यंतचा रस्ता, महापालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज विद्यालयाजवळील रस्ता, दिघी गावठाणातील संभाजीनगरमधील चौधरीपार्क कॉलनी क्रमांक दोनजवळील रस्ता
वाहन चालकांना मनस्ताप
- खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहने आदळण्याच्या प्रमाणात वाढ
- खड्ड्यांत वाहने अडकून घसरल्याने वाहन चालकांना दुखापती
- रहदारी मंदावली, आळंदी रस्ता, दिघी रस्त्यांवर वाहतूक कोंडी
चक्रपाणी वसाहतील घरांत पाणी
चक्रपाणी वसाहतीतील श्रीराम कॉलनीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरत असल्याने येथील बऱ्याच नागरिकांनी जवळील नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. शिवशंकर कॉलनीकडून श्रीराम कॉलनीकडे येणाऱ्या नाल्यावर काहींनी घरे बांधल्यामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी घरात शिरत असल्याची तक्रार येथील नागरिकांची आहे. मैलामिश्रित पाणी शिरल्याने येथील नागरिकांना घरांत राहणे अवघड झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.