पिंपरी-चिंचवड

भोसरीच्या विविध भागांतील खड्ड्यांनी वाहनचालक हैराण

CD

भोसरी, ता. ५ ः विविध भागांतील काही रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे भोसरीतील बालाजीनगरमध्ये मे महिन्यात सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी बुद्धविहारसमोरील रस्ता खोदण्यात आला होता. त्याचप्रमाणे भोसरीतील गवळीनगरमधील रस्ताही एक वर्षापूर्वी सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. मात्र या खड्ड्यांचे महापालिकेकडून वेळीच डांबरीकरण झाले नाही. त्याचप्रमाणे खोदकामामुळे झालेली चरही व्यवस्थित भरली गेली नसल्याने पावसामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे भोसरीतील दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागील रस्त्यावरही पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांत पडून वाहन चालक जखमी होत आहेत.
बालाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते प्रा. बी. बी. शिंदे म्हणाले, ‘‘बालाजीनगरमधील रस्त्यावर खड्डे पडल्याने शाळेत जाणारी लहान मुले, स्त्रिया घसरून पडत आहेत. मे महिन्यात काम केलेले असतानाही महापालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे. या विषयी महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: विषारी 'कफ सीरप'प्रकरणी 30 कंपन्यांची तपासणी सुरु; 22 मुलांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग

पालघरमधील 'या' रेल्वे प्रकल्पाला चालना, भुयारी मार्गासाठी निधी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

IND vs WI 2nd Test: एक सुटला, दोनदा सुटला, पण तिसऱ्यांदा पकडलाच, केल राहुलने घेतलेल चंद्रपॉलचा कॅच पाहिला का?

Dhule News : धुळे जिल्ह्याला मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांशी भेटीनंतर तातडीने 'अतिवृष्टीग्रस्त' समावेशाचा जीआर पारित

Mouse Research : तुमचं प्रायव्हेट बोलणं कुणीतरी ऐकतंय! लॅपटॉप-कॉम्प्युटरचा माऊस ठरेल कळीचा नारद; रिसर्चमधून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT