पिंपरी-चिंचवड

भोसरीतील रस्त्यांचे डांबरीकरण अखेर सुरू

CD

सकाळ इम्पॅक्ट

भोसरी, ता. ४ ः भोसरीतील दिघी रस्ता, लांडेवाडीतील रस्ता आणि आळंदी रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच महापालिकेने त्यांची डागडुजी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे त्रस्त वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दिघी, लांडेवाडी आणि आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे संत निरंकारी भवनासमोरील रस्त्यावरील धुळीनेही वाहन चालक त्रासले होते. या विषयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये ‘भोसरी परिसरात रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या डांबरीकरणास पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने सुरूवात केली.
भोसरीतील दिघी रस्ता, लांडेवाडीतील लांडेवाडी चौक ते पीसीएमसी चौकापर्यंतचा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहनांची कोंडीही या रस्त्यावर होत होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. बुधवारी रात्री या रस्त्यांवरील खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) लांडेवाडीतील लांडेवाडी चौक ते पीसीएमसीपर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र शुक्रवारी साडेचार वाजता भोसरी परिसरात जोरदार पडलेल्या पावसामुळे आळंदी रस्त्यावरील खड्ड्यांच्या डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग स्थापत्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, शनिवारी (ता. ४) पुन्हा या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rabi Sowing: पाणी नाही, पेरणी नाही! महाराष्ट्रात रब्बी हंगामाची अवघी २७ टक्के पेरणी

Vaibhav Sooryavanshi: २८ षटकार अन् ५२ चेंडूंत द्विशतक... वैभवने रचले विश्वविक्रमांचे डोंगर! कोणते केलेत World Records? जाणून घ्या

त्सुनामीने घरं उद्ध्वस्त, आर्थिक अडचण, परिस्थितीवर मात करत दाखवला करिष्मा; शेतकऱ्याच्या दोन्ही मुली बनल्या IAS आणि IPS अधिकारी

Maharashtra Live news : पालघर - बोईसर येथे बाईकचा भीषण अपघात

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

SCROLL FOR NEXT