पिंपरी-चिंचवड

पेव्हिंग ब्लॉकमुळे पदपथ धोकादायक

CD

भोसरी, ता. १ ः इंद्रायणीनगरातील विविध रस्त्याच्या कडेच्या पदपथावर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था झाली आहे. ते निखळल्याने पदपथावर खड्डे पडले आहेत. हे पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. पदपथावरील पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगराचा परिसर बंगल्यांसह टोलेजंग इमारतींनी व्यापलेला आहे. रस्त्यांचे जाळेही सर्वत्र पसरले आहे. रस्त्याकडेला पादचाऱ्यांसाठी केलेल्या पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. मात्र, हे ब्लॉक निखळल्याने पदपथावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे ब्लॉक खचले आहेत. त्यामुळे पदपथ खाचखळग्यांचा आणि ओबडधोबड झाला आहे. पदपथावरील खड्ड्यांमुळे ते अधिक धोकादायक झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अशा पदपथावरून चालणे तारेवरची कसरत ठरत आहे. त्यामुळे पदपथावरील पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

या पदपथांची दुरवस्था
इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमधील श्री साई चौक ते मिनी मार्केट, भाजी मंडईजवळील मोकळ्या प्लॉटलगतचे पदपथ, पेठ क्रमांक तीन वसातमधील कालीमाता मंदिर ते स्पाइन रस्त्याकडे जाणारा पदपथ आदींसह इतरही काही रस्त्यावरील पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक खचले आहेत.

अकराशे वीस स्कीममध्येही दुरवस्था
पेठ क्रमांक दोनमधील स्कीम क्रमांक अकराशे वीसमधील इमारत क्रमांक १ ते ७० आजूबाजूच्या परिसरातील अर्बन स्ट्रीट योजनेअंतर्गत बसवलेले पेव्हिंग ब्लॉक खचलेले आहेत, तर काही ठिकाणी निखळले आहेत. काही ठिकाणी घूस लागून खड्डेही पडले आहे.


‘लॉकिंग सिस्टिम’चा अभाव
पेठ क्रमांक एकमधील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाजवळील रस्त्यालगतही पेव्हिंग ब्लॉक बसविलेले आहेत. मात्र, या ठिकाणी रस्त्याकडील बाजूच्या ब्लॉकला बंदिस्त करण्यासाठी (लॉकिंग सिस्टिम) नसल्याने हे ब्लॉक निखळत आहेत.

नादुरुस्त पदपथांमुळे अडचणी
- लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यास अडचण
- पेव्हिंग ब्लॉक निखळलेल्या मोकळ्या जागेत गवत उगवल्याने स्वच्छता करण्यास अडचणी
- पदपथावरून जाताना निखळलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे ठेच लागणे व पाय मुरगळण्याच्या घटना घडतात
- नादुरुस्त पेव्हिंग ब्लॉकमुळे पदपथ आणि परिसराचे विद्रुपीकरण होते
- नादुरुस्त पदपथामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जावे लागते. त्यामुळे वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.

इंद्रायणीनगरातील पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक खचल्याने मुख्य रस्त्याने चालावे लागते. त्यामुळे वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पदपथावरील पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- राहुल ठोकळे, कामगार

लहान मुलांना पदपथावरून घेऊन जाताना पदपथावर पडलेल्या खड्ड्यात पाय अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पदपथावरून चालता येत नाही. दुरुस्त केलेले पदपथ पुन्हा एक दोन-महिन्यात निखळत असल्याने समस्या कायम राहत आहे.
- एक महिला स्थानिक नागरिक, इंद्रायणीनगर

इंद्रायणीनगरातील पदपथांची पाहणी करण्यात येईल. नादुरुस्त पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉकच्या दुरुस्तीसह नव्याने पेव्हिंग ब्लॉक
बसविण्यात येईल.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

SCROLL FOR NEXT