पिंपरी-चिंचवड

पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

CD

भोसरी, ता. ६ : इंद्रायणीनगर परिसरातील रस्त्यालगतच्या पदपथांवर बसविण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था झाली होती. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक निखळल्याने पदपथ खड्डेमय बनले होते. हे पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पदपथाची तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगर हा प्राधिकरणात येतो. बंगल्यांच्या आणि उंच इमारतींच्या दाट वस्तीमुळे या परिसरात रस्त्यांचे विस्तृत जाळे आहे. त्याच अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी पदपथांवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते. मात्र, काही पदपथावरील हे पेव्हिंग ब्लॉक निखळल्याने पदपथावर खड्डे पडले होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी खचलेही होते. पदपथ खाचखळग्यांचे आणि ओबडधोबड झाले होते. असे पदपथ ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, महिला आदींसाठी धोकादायक ठरत होते. याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता. २) ‘पेव्हिंग ब्लॉकमुळे पदपथ धोकादायक स्थितीत’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंद्रायणीनगरातील पदपथाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पादचारी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT