पिंपरी-चिंचवड

बिबट्याच्या अफवेने भोसरी-दिघीत घबराट

CD

भोसरी, ता. ८ : एका सीमाभिंतीवरील तारेच्या वर्तुळाकार कुंपणात बिबट्या फिरतानाची चित्रफीत व्हायरल झाल्याने भोसरी आणि दिघीमधील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. अखेरीस ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
ही चित्रफीत गेल्या चार दिवसांपासून फिरत आहे.
दिघीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमाभिंतीवर सैनिकांनी बिबट्याला पाहिले असून ते ध्वनिवर्धकाद्वारे नागरिकांना सतर्क करीत असल्याचा दावा चित्रफितीत केला जात होता. त्यामुळे भीती निर्माण झाली होती. याबाबत दिघीतील सीएमई सीमा भिंतीच्या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांशी संपर्क साधला असता असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
चऱ्होलीमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या बिबट्याचा वावर असल्याच्या राज्यभरातून येत आहेत. त्यामुळे नागरिक घाबरले होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT