पिंपरी-चिंचवड

भोसरीत निवडणुकीची धामधूम

CD

इच्छुकांची मतदारांपर्यंत
पोहोचण्यासाठी धडपड


भोसरी, ता. १७ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्वच इच्छुक उमेदवारांची मतदारांपर्यंत पोचण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मुलाखती सुरू आहेत. अद्यापपर्यंत पक्षाद्वारे कोणालाही अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, काही उमेदवार मतदारांपर्यंत पक्षाच्या चिन्हासह तर काही उमेदवार पक्षांच्या चिन्हाशिवाय प्रभागात मतदारांशी गाठीभेटी घेतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भोसरीतील वातावरण सध्या तापू लागले आहे.
महापालिकेच्या निवडणूक होणार की नाही याबद्दल काही उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था होती. त्यामुळे त्यांनी प्रभागात कार्यक्रम घेणे टाळले होते. तर काहींनी निवडणूक होणार असे गृहित धरून प्रभागात विविध कार्यक्रम राबविले होते. तर काहींना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असे वाटल्याने त्यांनी २० डिसेंबरपर्यंत मतदारांसाठी विविध कार्यक्रमाची आखणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम १५ डिसेंबरलाच जाहीर करत आचारसंहिता लागू केली. त्यामुळे हे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी या-ना त्या कारणाने निवडणूक रद्द होणार असल्याचे गृहीत धरून गाफील राहिलेल्या इच्छुकांची धावपळ झालेली पाहायला मिळत आहे.
सध्या इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी मुलाखत देत आहेत. मात्र, पक्षांद्वारे अद्याप कोणालाही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. ऐनवेळेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवून निवडणुकीत नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे काही इच्छुकांद्वारे प्रभागात चिन्ह विरहित आणि कोणत्याही पक्षाच्या झेंड्याव्यतिरिक्त प्रभागात प्रचार करण्यात येत आहे. काहींनी पक्षाच्या चिन्हांसह प्रभागात प्रचार सुरू केला आहे. यामध्ये बहुंताश माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

कामगारांसाठी फेरीच्या वेळेत बदल
प्रभागात सकाळी कार्यकर्त्यांसह फेरी काढत उमेदवारांद्वारे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला जात आहे. भोसरी परिसरात बऱ्याच प्रभागात कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळच्या कामाच्या वेळेत या मतदारांशी संपर्क साधता येता नाही. त्यामुळे संध्याकाळीही फेरी काढत मतदारांशी संवाद साधला जात आहे. मतदारांना स्वतःच्या माहितीचे प्रचार पत्रक देतानाच नवीन वर्षांची दिनदर्शिकाही मतदारांना देण्यात येत आहे.

महिला उमेदवांचा हळदी कुंकू
प्रभागात महिला उमेदवारांनीही प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. महिला उमेदवार मतदारांच्या घरी गेल्यावर काही महिलांद्वारे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

प्रभागाच्या विकासाचे आश्वासन
नवख्या उमेदवारांद्वारे प्रचार पत्रक वाटत प्रभागाच्या विकासाचे आश्वासन दिले जात आहे. तर माजी नगरसेवकांद्वारे प्रभागात केलेली विकास कामे प्रचार पत्रकांद्वारे मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच्छुक उमेदवार आल्यावर प्रभागातील न सुटलेल्या काही समस्यांचा पाढा मतदारांद्वारे वाचला जात आहे. त्या समस्या सोडविण्याचेही आश्वासन उमेदवारांद्वारे मतदारांना देण्यात येत आहे.

उमेदवारांचा बैठकीवर भर
प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी उमेदवारांद्वारे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. तर काही उमेदवार समाजाची बैठक घेऊन समाजाला या निवडणुकीत विश्वास टाकण्याचे आवाहन केले जात आहे. तर काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांशी गुप्त बैठकीत प्रचाराची रणनीती अवलंबिली जात आहे.

काही उमेदवारांद्वारे डिजिटल स्क्रीनद्वारे प्रचार
परिसरात सध्या तरी रिक्षामधून ध्वनिक्षेपकांचा उमेदवारांच्या प्रचाराचा आवाज येताना दिसत नाही. मात्र, काही माजी
नगरसेवकांद्वारे प्रभागात केलेल्या कामाची माहिती डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ध्वनिमुद्रित चित्रफितीद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही त्यांच्याद्वारे होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT