पिंपरी-चिंचवड

अॅथलेटिक ट्रॅक दुरुस्तीसाठी पुन्हा बंद

CD

भोसरी, ता. २० ः येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक ट्रॅक पुन्हा उखडल्याने हा ट्रॅक दुरुस्तीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ॲथलेटिक खेळाडूंमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेद्वारे निकृष्ट दर्जाचा तयार केलेला हा ट्रॅक वारंवार उखडत असल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात एकमेव अॅथलेटिक ट्रॅक आहे. २०१९मध्ये कोरोना काळात दोन वर्ष बंद असलेला हा अॅथलेटिक ट्रॅक कोरोनानंतर सुमारे नऊ महिने सुरू राहिला. त्यानंतर मार्च २०२३पासून नूतनीकरणासाठी बंद केलेला ट्रॅक मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आला. मात्र निकृष्ट कामामुळे एक महिना सुरू राहिलेला हा ट्रॅक पुन्हा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२४ला ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. एप्रिल २०२५ला हा ट्रॅक सुरू करण्यात आला. आता २० डिसेंबरपासून हा ट्रॅक दुरुस्तीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणाऱ्या ट्रॅकमुळे ॲथलेटिक खेळाडूंच्या सरावातही व्यत्यय येत आहे. २०२३ ते डिसेंबर २०२५ या दरम्यान हा ट्रॅक खेळाडूंसाठी साडेअकरा महिने सुरू राहिला होता. त्यामुळे २०१९ ते २०२५ या सहा वर्षांच्या कालावधीत हा ट्रॅक जेमतेम दोन वर्षे सुरू राहिला होता. त्यामुळे अॅथलेटिक खेळाडूंच्या सरावाअभावी खेळावर परिणाम होऊन ते जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील स्पर्धेत मागे राहिले.

तक्रारीने ट्रॅक बंद होण्याची भीती
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नव्याने बनविलेला अॅथलेटिक ट्रॅक निकृष्ट दर्जाचा झाला आहे. त्यामुळे तो वारंवार उखडत आहे. या विषयी खेळाडूंनी तक्रार केल्यावर दुरुस्तीच्या नावाखाली महापालिका ट्रॅक बंद ठेवते आणि दुरुस्तीचे कामही अगदी संथगतीने होत असल्याचा अनुभव खेळाडूंनी यापूर्वी घेतला आहे. त्यामुळे उखडलेल्या ट्रॅकची तक्रार केल्यावर महापालिका पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली ट्रॅक बंद करेल या भीतीने खेळाडू तक्रार करत नाहीत.


खेळाडूंच्या अडचणी
-शहरातील एकमेव ट्रॅक बंद राहिल्याने सरावात अडथळा.
-आर्थिक अडचणीमुळे पुण्यातील अॅथलेटिक ट्रॅकवर सरावाला जाता येत नाही.
-सराव होत नसल्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील कामगिरीवर परिणाम.


बालेवाडी स्टेडिअममधील अॅथलेटिक ट्रॅकवर सरावासाठी जाणे वेळ आणि आर्थिक कारणाने परवडत नाही. मात्र येथील ट्रॅक महापालिकेद्वारे वारंवार बंद करण्यात येत असल्याने सरावामध्ये सातत्य राहत नाही, याचा स्पर्धेतील कामगिरीवर परिणाम होत आहे.
-एक ॲथलेटिक खेळाडू

महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील नादुरुस्त अॅथलेटिक ट्रॅक तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. येत्या एक आठवड्यात या ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर लगेच हा ट्रॅक खेळाडूंसाठी सुरू करण्यात येईल.
-मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य क्रीडा व उद्यान विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

ASHA MOVIE REVIEW: विषय, कथा, मांडणी सुंदर पण प्रेक्षकांना भावेल का? कसा आहे रिंकू राजगुरूचा 'आशा' चित्रपट?

Latest Marathi News Live Update : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

SCROLL FOR NEXT