पिंपरी-चिंचवड

उमेदवारीच्या खात्रीअभावी प्रचार मंदावला

CD

भोसरी, ता. २४ ः महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर इच्छुकांनी जोरदार प्रचार सुरू केला, मात्र पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री होताच प्रचार मंदावला. त्यामुळे निवडणुकीत सुरवातीला भरलेला रंग काहीसा कमी होत आहे.
निवडणूक जाहीर होताच इच्छुकांचे पेव फुटले होते. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी एकमेकांना वरचढ असा प्रचार प्रभागात सुरू केला होता. त्यामुळे भोसरी परिसरातून निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत होता. आता उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर होऊनही पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे उमेदवार आयात करण्याचे सत्र सुरू झाले आहे. पक्षाच्या आतील गोटातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळताच इच्छुकांनी प्रचार सध्या तरी थांबविला आहे. त्यांचे पक्षाच्या राजकीय घडामोडींकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मिळण्याच्या आशेने इच्छुकांनी पक्षाच्या चिन्हासह स्वतःची माहिती देणारी पत्रके, बॅनर छापून घेतले. आता ही पत्रके घरीच ठेवण्याची वेळ आली आहे. या जाहिरातीच्या खर्चाचा भुर्दंडही इच्छुकांना सहन करावा लागला आहे.

बदलती राजकीय परिस्थिती
पक्ष तिकीट देत नसल्याने आणि इतर पक्षांतील नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरू असल्याने रोज राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणांचा इच्छुकांना थांगपत्ता लागत नसल्याचे दिसते. काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेल्या उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची लगबग वाढल्याचे दिसते.

फोडाफोडीचे राजकारण सर्वव्यापी
आमदार, खासदारकीच्या निवडणुकीतून महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीचे राजकारण पाहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजल्यावरही राज्यभरात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकाणास पिंपरी चिंचवड शहरही अपवाद ठरले नाही. पिंपरी चिंचवडमध्येही राजकीय पक्षांनी फोडाफोडीचे राजकारण करत राजकीय रणांगणातील मोठे धुरंधर गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
---
‘अजूनही आशा’
भोसरीतील एका इच्छुक उमेदवाराने सांगितले की, ‘मी एका राजकीय पक्षाचे गेल्या पंधरा वर्षांपासून तन मन धनाने काम करत आहे. आमदार, खासदारकीच्या निवडणुकीतही पक्षाला मदत केली. त्यावेळेस पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता पक्षाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. ३० डिसेंबरपर्यंत निवडणूक अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे अजूनही पक्ष माझी उमेदवारी जाहीर करील अशी आशा आहे.’
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT