पिंपरी-चिंचवड

भोसरीतील रस्त्यांना भाजी मंडईंचे स्वरुप

CD

भोसरी, ता. ३० : भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील सर्वच प्रमुख रस्ते आणि चौक भाजी-फळे विक्रेत्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे रस्त्यांना चक्क भाजी मंडईंचे स्वरुप आले आहे. भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत असून मंडई वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. याबद्दल नागरिक आणि वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून विविध रस्त्यांवर अतिक्रमण विरोधी कठोर कारवाई होणे आता गरजेचे झाले आहे.
भोसरी परिसरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस भाजी, फळे विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे. भाजी, फळे विक्रेते रस्त्यांच्या कडेला किंवा हातगाडी लावून बसलेले असतात. एकाच ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी वारंवार बसत असल्याने काही दिवसांनंतर ती जागा आपल्या हक्काचीच असल्याची भावना विक्रेत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे महापालिकेने काही वेळा कारवाई केल्यास महापालिकेने अन्याय केल्याचे विक्रेत्यांचे मत होते. त्यामुळे सुरवातीपासूनच अनधिकृतपणे विक्रेते बसूच नयेत यासाठी महापालिकेने खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

संध्याकाळी नेहमीच कोंडी
संध्याकाळच्या वेळेस भाजी-फळे खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यांच्या कडेलाच वाहने लावतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन इतर वाहनांसाठी कमी जागा राहत आहे. भोसरीतील दिघी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, दिघीतील आदर्शनगरमधील मुख्य रस्ता या रस्त्यांवर संध्याकाळी नेहमीच वाहनांची कोंडी झालेली असते. भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावरील फळे विक्रेत्यांचे पुनर्वसन राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली केले होते. मात्र, फळे विक्रेते पुन्हा रस्त्यावरच हातगाडी लावणे पसंत करत आहेत.


दिघीला भाजी मंडईच नाही
दिघी हे झपाट्याने विकसित होणारे उपनगर असून त्याच्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. दिघीची लोकसंख्या वाढत असतानाही दिघीमध्ये एकही भाजी मंडई नाही. त्याचप्रमाणे महापालिकेकडे भाजी मंडईसाठी जागाही आरक्षित नाही. त्यामुळे दिघीकरांना रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.

पार्किंगच्या जागेवर दुकाने
भोसरीतील इंद्रायणीनगरात भाजी मंडईच्या गाळ्यांचा भाजी विक्रेत्यांना ताबा दिला आहे. मात्र गाळ्यांमध्ये भाजी विक्रीसाठी न बसता विक्रेत्यांनी मंडईतील वाहनांच्या पार्किंगच्या जागेत दुकाने थाटली आहेत. त्यामुळे भाजी मंडईतील गाळे रिकामेच आहेत. याकडेही महापालिका दुर्लक्ष करत आहे.

कुठे भरतेय मंडई ?
भोसरीतील दिघी रस्ता, संत तुकारामनगरातील संत तुकाराम मंदिरासमोरील रस्ता, प्रियदर्शनी शाळेसमोरील रस्ता, आळंदी रस्त्यावरील बनाचा ओढा ते मॅगझीन चौक, पीएमटी चौकातील गावठाणाकडे जाणारा रस्ता, पुणे-नाशिक महामार्गावरील पीएमटी चौक ते चांदणी चौकापर्यंतचा रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील रस्ता, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केटजवळील रस्ता, साई चौक ते संतनगर चौक, श्री तिरुपती बालाजी चौक, श्री तिरुपती बालाजी चौक ते संतनगरकडे जाणारा रस्ता, दिघीतील आदर्शनगरातील मुख्य रस्ता ते छत्रपती संभाजीमहाराज चौकाकडे जाणारा रस्ता, विठ्ठल मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज चौक, पुणे-आळंदी पालखी मार्ग आदी.


काय आहेत समस्या ?
- विक्रेत्यांकडून अनधिकृतपणे रस्त्यांचा ताबा
- पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जाणे भाग.
- रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी. अपघाताचाही धोका.
- रस्त्यांचे विद्रुपीकरण आणि बकाल अवस्था.


काय करायला हवे ?
- वर्दळीच्या रस्त्यांवरील भाजी-फळे विक्रेत्यांवर नियमित कारवाई
-विविध विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे, हॉकर्स झोन तयार करणे.
- रस्ते अतिक्रमणमुक्त करणे.

भोसरीतील दिघी रस्ता भाजी विक्रेते आणि फळे विक्रेत्यांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर चालकांना वाहतूक कोंडीचा रोजच सामना करावा लागतो.
- मधुकर पिसे, वाहन चालक

भोसरीतील रस्त्यांवर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेत्यांविरोधात नियमित कारवाई सुरूच आहे. अनधिकृत विक्रेत्यांवरील कारवाईत सातत्य ठेवून ती अधिक कडक करण्यात येईल.
- तानाजी नरळे, इ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

BHS25B03402, 03403

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT