पिंपरी-चिंचवड

पक्ष बदलल्याने नव्या चिन्हासह प्रचार

CD

भोसरी, ता. ४ : महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार, असे गृहीत धरून इच्छुकांनी पक्षाचे चिन्ह घेऊन प्रभागात प्रचार केला होता. मात्र, राजकीय पक्षाने ऐनवेळेस तिकीट कापल्याने इच्छुक उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळवत उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे आता उमेदवारांनी त्या पक्षाचे चिन्ह घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सर्वच इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पक्षाचे ‘एकनिष्ठ’ म्हणून काम केल्यामुळे पक्ष आपल्यालाच निवडणुकीचे तिकीट देईल, असे गृहीत धरून काही उमेदवारांनी त्या पक्षाचे चिन्ह घेऊन पक्षाची उमेदवारी मिळण्यापूर्वीच प्रभागात प्रचाराला सुरूवात करत चिन्ह घराघरांत पोचविले होते. त्या निवडणूक चिन्हासह अहवाल छापून तोही घराघरांत पोचविला होता. मात्र, पक्षाने तिकीट नाकारल्याने काही इच्छुकांनी दुसऱ्या राजकीय पक्षाशी संपर्क साधत ‘ए-बी’ फॉर्म मिळवला. त्यामुळे या उमेदवारांनी आता नवीन चिन्हांसह प्रभागात प्रचाराला सुरूवात केली आहे.
यापूर्वी प्रचार केलेल्या चिन्हावर मतदान न करता आता नव्या पक्षाच्या चिन्हावर मतदान करावे, असे आवाहनही या उमेदवारांकडून केले जात आहे.


प्रचाराचा धुमधडाका
रविवारी (ता. ४) सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रभागात रॅली काढत प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळे रविवार राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या प्रचाराच्या धामधुमीचा ठरला. मतदानासाठी अवघे बारा दिवस उरल्याने उमेदवार प्रभागातील सर्व उमेदवारांर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

चारही उमेदवारांचे एकत्रित शक्तिप्रदर्शन
राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार न करता प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्र येत प्रचार करत शक्तिप्रदर्शन केले. चारही उमेदवारांच्या समर्थकांनी प्रचारात सहभाग घेतल्याने रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी गर्दी लांबवर गेली होती. पारंपरिक ढोलताशा, हलगी-पिपाणीच्या गजरात ध्वनिक्षेपकाद्वारेही पक्ष आणि उमेदवारांची माहिती मतदारांना देण्यात येत होती.

सर्व उमेदवार समभाव!
उमेदवारांची रॅली प्रमुख चौकात आल्यावर काही व्यावसायिक उमेदवारांचे स्वागत शाल, श्रीफळ देऊन करताना दिसले. मात्र, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे स्वागत अशाच प्रकारे करत या दुकानदारांनी सर्व उमेदवार समभाव दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT