पिंपरी-चिंचवड

शिवराय, गाडगेबाबा यांची जयंती भोसरीत विविध कार्यक्रमांनी उत्साहात

CD

भोसरी, ता. २२ ः इंद्रायणीनगरातील बुद्धविहारात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे, नगरसेविका अश्विनी वाबळे, नम्रता लोंढे, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब डोळस होते. यावेळी राजू ससाणे, विजय भालेराव, विशाल रोकडे, ज्ञानेश्वर दांडगे, प्रकाश डोळस, वाकोडे निंबाजी, मुरलीधर गणवीर, दीपक पोहरे, किशोर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महापौर यांना गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी वह्या भेट देण्यात आल्या.
यावेळी व्याख्याते संजय बेंडे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज - एक आदर्श व्यक्तिमत्त्व’ तर व्याख्याते एस. एल. वानखेडे यांनी ‘संत गाडगे बाबा यांचे कार्य - एक आदर्श’ या विषयावर व्याख्यान दिले.
व्याख्याते वानखेडे म्हणाले, ‘‘संत गाडगेबाबांनी साध्या आणि सहज बोली भाषेत कीर्तन करत समाजातील अंधश्रद्धेवर घणाघात केला. त्यांनी समाजात शिक्षणाचे महत्त्व रुजवले.’’
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण तायडे, आयुष डोळस, सोपान इंगळे, छाया बोरसे, विद्या रोकडे, ज्योती डोळस, आदींनी परिश्रम घेतले. प्रा. नामदेव वाळके यांनी सूत्रसंचालन केले. तर संतोष मोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Solapur District Dams: साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त; २१२ पैकी १६५ धरणांतून तीन वर्षांत काढला ११६ दलघमी गाळ!

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT