पिंपरी-चिंचवड

भोसरीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू

CD

भोसरी, ता. २३ ः भोसरीतील गवळीनगर-सॅंडवीक कॉलनी-संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक पाचमधील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक सातमधील हे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे गावठाणासह बाजारपेठ असलेल्या प्रभाग पाचमधील खड्ड्यांपासून नागरिक आणि वाहनचालकांची सुटका होईल.
दिघी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गंगोत्री पार्कमधील रस्ता नेहमीच खाचखळग्यांनी भरलेला असायचा. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार होत होते. त्यामुळे नागरिकांनी आंदोलनही छेडले होते. इतर रस्त्यांवरही खड्ड्यांची समस्या कायम होती. त्यामुळे ग्रामस्थांसह चालकही त्रस्त झाले होते. अखेर महापालिकेने रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. यामध्ये भोसरी गावठाण-गव्हाणेवस्ती-आदिनाथनगर प्रभाग क्रमांक सातमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. याशिवाय प्रभाग पाचमधील प्रमुख रस्त्याचेही काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. आळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. दिघी रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर आळंदी रस्त्याच्याही काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती महापालिकेच्या इ प्रभाग स्थापत्य विभागाद्वारे देण्यात आली. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील रस्तेही खड्डेमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. कै. सखूबाई गवळी उद्यान ते दिघी रस्त्याचे काम २०२३ मध्येच पूर्ण झाले. त्यानंतर तीन वर्षांची प्रतिक्षा संपण्याची भोसरीतील नागरिकांना आशा आहे.

महापालिकेने याकडेही लक्ष द्यावे
दरम्यान, महापालिकेने भोसरी गावठाण आणि परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र या रस्त्यावर पावसाळी आणि गटारी चेंबरची झाकणे वारंवार खचणे, तुटणे असे प्रकार होतात. अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक पाचमधील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर आहे. त्यामुळे महापालिकेने चेंबरची झाकणे उत्कृष्ट दर्जाची बसविण्याबरोबरच चेंबरची पातळी रस्त्याच्या पातळीशी समतोल करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.

असे आहे रस्त्याचे नियोजन

रस्त्याचे नाव ः लांबी व रुंदी (मीटर) ः निविदा रक्कम (रुपये) ः कामाची सद्यःस्थिती ः मुदत
दिघीरस्ता ः १२७० व १८ ः १९,४६,१५,०४८ ः ८० टक्के पूर्ण ः जून २०२७
आळंदीरस्ता ते दिघीरस्ता, संत तुकारामनगर ः १३५४ व (१२, ९, ६) ः ११,६२,२९,२१४ ः ३० टक्के पूर्ण ः ऑगस्ट २०२८

---
सिमेंट काँक्रिट रस्त्यामुळे भोसरी दिघी रस्ता व दिघी रस्ता ते गोकुळ स्वीट मार्ट दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार आणि रुग्णांना ये-जा करणे अधिक सोयीचे होईल. यामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था सक्षम होऊन स्थानिक व्यापार, व्यवसाय आणि नागरी सुविधांना चालना मिळेल.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, इ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
---
दिघी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे वाहन चालवणे सुकर होणार आहे. गंगोत्री पार्कमध्ये रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने दिघीला जाणे सोयीस्कर झाले आहे, मात्र बन्सल सिटी ते दिघेपर्यंतच्या रस्त्याचेही सिमेंट काँक्रिटीकरण झाले पाहिजे.
- शुभांगी भोसले
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

MUMBAI INDIANS: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एका प्रशिक्षकाची एंट्री; राजस्थान रॉयल्ससोबतही केलंय काम

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT