चिखली, ता. १९ : चिखली येथील नेवाळे वस्ती परिसरात जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला ट्रकने धडक दिल्याने
लाखो लिटर पाणी वाया गेले. परिणामी काही भागात दुपारी पाणीपुरवठा करण्यात आला. पाणी वाया जात असल्याचे पाहून नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच संपर्क न होऊ शकल्याने सुमारे तासभर हे पाणी वाहत राहिले. त्यामुळे सकल भागात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली होती. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
फोटो ः ००२१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.