पिंपरी-चिंचवड

घराची नोंद करण्यासाठी पैसे कशासाठी?

CD

चिखली, २४ : महापालिकेच्या कर संकलन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून घराची नोंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असून, अनधिकृत बांधकामे असल्याचे कारण देऊन नागरिकांची अक्षरशा लूट केली जात आहे. मिळकतीची नोंद केल्यानंतर पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न सुरू होणार असूनही पालिका कर्मचारी आगाऊ रक्कम कशासाठी मागत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या चिखलीतील संकलन कार्यालयाकडून ही लूट न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष येस आणि यांनी दिला आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नागरिक बांधकाम केल्यानंतर रस्ते, सांडपाणी, पाणी इत्यादी पायाभूत सुविधांच्या बदल्यात नागरिक मिळकत कर भरतात. मात्र, मिळकतकर भरण्यासाठी जी नोंद महापालिकेकडे केली जाते. त्या मिळकतीची नोंद करण्यासाठी चिखली येथील करसंकलन कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून एका गुंठ्या मागे ३० ते ५० हजार रुपये रकमेची मागणी केली जाते. मात्र, या रकमेबाबत नागरिकांकडून विचारणा केली असता तुमचे बांधकाम अनधिकृत आहे. मिळकतीची नोंद करायची असेल तर लिपिकापासून मुख्य कर संकलन अधिकाऱ्यांपर्यंत पैसे द्यावे लागतात. तरच फाइल पुढे सरकते. अन्यथा अनधिकृत बांधकाम असल्याने त्याची नोंद होत नाही. परिणामी, बांधकाम पाडावे लागेल तुमचे लाखो रुपये वाया जातील. त्यामुळे सांगितलेली रक्कम द्या आणि मिळकतीची नोंद करून घ्या, अशी कारणे दिले जातात. अधिकृत बांधकाम असेल तर तुम्हाला भविष्यात तुमचे बांधकाम वाढवता येईल, त्यामुळे पैसे देऊन नोंद करून घ्या आणि पाहिजे त्याप्रमाणे बांधकाम करा अशा प्रकारचा सल्ला करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांकडून दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोंदीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक नागरिक पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या लुटीमुळे हतबल झाले आहेत, हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

‘‘मिळकतीच्या नोंदीसाठी पैसे मागत असल्याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला नाही. मात्र, असा प्रकार घडत असल्यास सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना प्रथम सूचना देऊन असा प्रकार करण्याबाबत मज्जाव करण्यात येईल.
बी. आर. लोंढे, करसंकलन अधिकारी, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT